गुळवंच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली समांतर पाणी योजनेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:36 PM2019-12-06T18:36:06+5:302019-12-06T18:36:34+5:30
सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या समांतर पाणी योजनेची गुळवंच येथील पथकाने पाहणी केली. गुळवंचलाही अशाच प्रकारची योजना ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी योजनेचा अभ्यास केला. पाटोळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी योजनेची माहिती दिली.
सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या समांतर पाणी योजनेची गुळवंच येथील पथकाने पाहणी केली. गुळवंचलाही अशाच प्रकारची योजना ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी योजनेचा अभ्यास केला. पाटोळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी योजनेची माहिती दिली.
गुळवंचचे सरपंच केशव कांगणे, उपसरपंच भाऊदास शिरसाठ , ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे, सदस्य संतोष कांगणे, भगवान सानप, समाधान कांगणे यांनी पाटोळे गावात येऊन येथील बहुचर्चित समांतर पाणी योजनेची पाहणी करत समाधान व्यक्त केले. यावेळी पास्ते येथील ग्रामसेवक जे.एस. साखरे उपस्थित होते.
त्यांच्या गावातील महिला वर्गाची पाण्यासाठीची होणारी वणवण पाहता,पाण्याची उपलब्धता व गरज ओळखून अभ्यासपूर्ण नियोजन करत समांतर पाणी योजना राबवली. गावास वेळेवर सहजरीत्या सर्वांना सारखे पाणी मिळत असल्याने गावकरी समाधानी आहेत. विशेषत: महिला वर्गाकडून या योजनेचे विशेष कौतुक होत असल्याने इंजिनियर मेघराज आव्हाड यांची सांगितले.
आटकवडे येथेही पाटोळे गावाच्या धर्तीवर समांतर पाणी योजना सुरू केली आहे. गुळवंच गावात पाण्याचे दोन जलकुंभ असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत असल्याने समांतर पाणी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पदाधिकाºयांनी पाणी योजनेची माहिती घेतली.
लवकरच गुळवंच गावातही अशीच योजना सुरू करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे यांनी सांगितले. पाटोळे येथील योजनेनतंर आटकवडे, धोंडवीरनगर येथे योजना राबविण्यात आल्या आहेत.