मालेगावी नगरसेवकावर रोखली बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:42 AM2020-01-11T01:42:09+5:302020-01-11T01:43:03+5:30

मालेगाव शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Gun fired at Malegawi councilor | मालेगावी नगरसेवकावर रोखली बंदूक

मालेगावी नगरसेवकावर रोखली बंदूक

googlenewsNext

मालेगाव मध्य : शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पवारवाडी पोलिसांत मो. आमीन मो. फारूख यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नगरसेवक मो. आमीन मो. फारूख शुक्रवारी दुपारी नमाजपठण करून घरी परतले. लहान मुलांना फळे घेण्यासाठी मुशावरत चौकात गेले होते. असता त्यांचा भाऊ मोहंमद यासीन याने त्यांना फोन करून घरापासून अमन हॉस्पिटलपर्यंत अज्ञात इसम बंदूक घेऊन येत असल्याची माहिती दिली.
याप्रकरणी मो. फारूख यांनी मित्र नगरसेवक मोहंमद तन्वीर, मोहंमद मोबीन व पवारवाडी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार मित्र व पवारवाडीचे हवालदार सचिन धारणकर, नवनाथ शेलार यांच्यासह घराजवळ पोहोचले त्यांच्या घरासमोर तोंडावर रुमाल बांधलेला अज्ञात इसम उभा होता. मो. आमीन यांच्या सोबत पोलीस पाहताच त्याने जवळ असलेले पिस्तुुलाने मो. अमीन यांना धाक दाखवला. यामुळे घाबरून अमीन घरासमोरील झाडांमध्ये पळाले, तर पोलिसांनी शेजारील गल्लीचा आश्रय घेतला. यानंतर ताज हॉटेल ते नूरबागपर्यंत पोलिसांनी संशयित इसमाचा पाठलाग केला. काही वेळातच पोलीस निरीक्षक पाटील नूरबाग चौकात पोहोचले. त्यांनी संशयित आरोपीचा शोध घेतला; मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक एजाज बेग, नबी अहमद, मुस्तकीम डिग्निटी यांच्यासह महागठबंधनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी संशयित आरोपीस त्वरित अटक करून घटनेची चौकशी करावी, अशी मागणी उपस्थितांनी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्याकडे केली. संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. त्यास लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. याबाबत सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाजीम शेख करीत आहेत.


 

Web Title: Gun fired at Malegawi councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.