पाथरे विकास संस्थेच्या अध्यक्षपदी गुंजाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:02+5:302020-12-06T04:14:02+5:30
सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेली ही संस्था शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. ही संस्था जवळपास २२०० सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासास ...
सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेली ही संस्था शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. ही संस्था जवळपास २२०० सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत असल्याने या संस्थेचे पद भूषविणे अभिमानास्पद असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. गुंजाळ यांच्या नावास सूचक बाळासाहेब चिने, तर अनुमोदक नवनाथ नरोडे तसेच चिने यांच्यासाठी सूचक मोकळ तर अनुमोदक गंगाधर सुडके होते.
अध्यक्षपदी डॉ. संदीप गुंजाळ यांची, तर उपाध्यक्ष प्रवीण चिने यांची सर्वानुमते निवड झाली. ही निवड आता पुढील निवडणूक प्रक्रियेपर्यंत राहील . साधारण दीड वर्षाचा कार्यकाळ या संचालक मंडळास मिळणार आहे. गुंजाळ आणि चिने यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पुढील काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी सभापती राजेंद्र घुमरे, माजी अध्यक्ष बाळासाहेब चिने, बाळासाहेब घुमरे, माजी पंचायत समितीचे सदस्य नवनाथ नरोडे, बाबासाहेब पाटील, चांगदेव गुंजाळ, अनिल गुंजाळ, भीमाजी पवार, रामनाथ चिने, राजेंद्र दवंगे, बाळासाहेब राहणे, सुखदेव गुंजाळ, हरिदास चिने, दत्तात्रय निकम, कैलास राहणे, रामनाथ निकम, रामराम रहाणे, गंगाधर सुडके, सुनील चिने, मयूर एरंडे आदींसह संचालक मंडळ, सभासद, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०५ पाथरे सोसायटी
सिन्नर तालुक्यातील पाथरे विकास संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप गुंजाळ, तर उपाध्यक्षपदी प्रवीण चिने यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित संचालक मंडळ.
===Photopath===
051220\05nsk_18_05122020_13.jpg
===Caption===
सिन्नर तालुक्यातील पाथरे विकास संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप गुंजाळ तर उपाध्यक्षपदी प्रवीण चिने यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित संचालक मंडळ.