जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोंधळ
By admin | Published: April 5, 2017 04:18 PM2017-04-05T16:18:52+5:302017-04-05T16:18:52+5:30
जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने गोंधळ घालण्यास सुरवात केली
नाशिक - जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने गोंधळ घालण्यास सुरवात केली असून त्यामुळे महिला व बाल कल्याण समितीच्या निबडणुकीचे काम ठप्प झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांनी पोलिसांना पाचारण केले आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत कोणालाही बहुमत नसतांना शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी सत्ता मिळवली त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक होत आहे मात्र काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य फुटून भाजपा आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना मिळाले आहेत. आज महिला आणि बाल कल्याण समितीची निवडणूक सुरु झाल्यानंतर काँग्रेस ने आपल्या सदस्यांना व्हीप देण्याचा आग्रह धरला परन्तु निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यास नकार देऊन निवडणूक प्रक्रिया राबविल्याने काँग्रेस आणि शिवसेनेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली असून निवडणुकीचे कामकाज रोखून धरले आहे