ज्ञानगंगेच्या दारी ‘मद्यपीं’ची वारी ुं‘यश इन’मध्ये ‘मुक्त’ कारभार : फेस्टीवलच्या पूर्वसंध्येलाच पर्यटकांचे रंग
By admin | Published: February 7, 2015 01:01 AM2015-02-07T01:01:44+5:302015-02-07T01:02:22+5:30
ज्ञानगंगेच्या दारी ‘मद्यपीं’ची वारी ुं‘यश इन’मध्ये ‘मुक्त’ कारभार : फेस्टीवलच्या पूर्वसंध्येलाच पर्यटकांचे रंग
नाशिक :ओझरच्या विमानतळावरील मद्य पार्टीचे प्रकरण गाजत असताना नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही अशाच प्रकारे शुक्रवारी मद्यपार्ट्या झडल्याचे वृत्त आहे. एका वाईन फेस्टीवलसाठी विद्यापीठाच्या ‘यश इन’ या इमारतीत वास्तव्यासाठी उतरलेल्या काही पर्यटकांच्या कक्षात चक्क अशाच पार्ट्या झाल्या असून ज्ञानगंगेच्या दारी थेट मद्यगंगा अवतरण्याच्या प्रकाराने विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी चक्रावले आहे. विद्यापीठ व्यस्थापनाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत. विद्यापीठाच्या आवारात यश इन ही इमारत मोठ्या परीषदा आणि तत्सम उपक्रमांसाठी बांधण्यात आली आहे.एखाद्या तारांकीत हॉटेल्सच्या धर्तीवर असलेल्या या इमारतीचा परिषदांव्यतिरिक्त वापर होत नसल्याने विद्यापीठाकडून अनेकदा भाड्यानेही खोल्या दिल्या जातात. शनिवारी विद्यापीठापासून हाकेच्या अंतरावर एका वायनरीत फेस्टीवल साजरा होणार आहे. त्यासाठी एका फर्मने विद्यापीठाच्या खोल्या पर्यटकांसाठी भाड्याने घेतल्या आहेत. आधीच वाईन फेस्टीवल, असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला या विद्यापीठाच्या धुंद वातावरणाचा प्रभाव त्या पर्यटकांवर ्रअसा झाला की, पर्यटकांनी म्हणून पवित्र ज्ञानदान करणाऱ्या विद्यापीठाच्या आवारातच अशा प्रकारे रसपान केले. विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचण्याचे ब्रीद असताना तेथे मद्याचे प्याले उसळल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.