७२ लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

By admin | Published: November 22, 2015 11:39 PM2015-11-22T23:39:42+5:302015-11-22T23:40:27+5:30

भद्रकाली पोलिसांची कामगिरी : द्वारकावर रोखले पॅकबॉडीचे ट्रक; चालकांना अटक

Gurkha police seized 72 lakhs | ७२ लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

७२ लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

Next

नाशिक : हैदराबादहून नाशकातील ओझर येथे ट्रकने पोहोचविला जाणारा लाखोंचा गुटखा भद्रकाली पोलिसांनी सकाळी नऊ वाजता द्वारका येथे सापळा रचून जप्त केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी गुटख्याच्या खोक्यांनी भरलेले दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. दोन्ही ट्रकमधील ७२ लाखांचा गुटखा दोन्ही ट्रकसह पोलिसांनी जप्त केल्या असून एकूण ९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हैदराबाद शहरातून हिरा पान मसाला, बाबा गुटखा, रॉयल ७१७ तंबाखुच्या पुड्यांचे शेकडो खोके भरून दोन्ही ट्रक मुंबईमार्गे सकाळी नाशिक मध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ नियोजन करून पथक तयार केले आणि द्वारका परिसरात सापळा रचला. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास द्वारका चौकात आलेले ट्रक (एमएच ४३ वाय १४३५) व (एमएच ४३ वाय ३५३७) पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी अडविले. ट्रकचालक जगन्नाथ मळी अलप्पा (वय ४५, रा. कल्लुर, कर्नाटक), मेराज हुसेन सय्यद (वय ३५, रा. राजुरेश्वर, कर्नाटक) यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.
पोलीस बंदोबस्तामध्ये गुटख्याचे भरलेले ट्रक भद्रकाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोलीस हवालदार चव्हाण, शेरू पठाण, मनोज डोंगरे, सातपुते, सोनार, पालिका अन्न औषध विभागाचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी आदिंनी सहभाग घेतला. दिवसभर पंचनामा सुरू होता. संध्याकाळी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)पोलीस ठाण्याच्या सभागृहात रचून ठेवलेली गुटख्याची पोती. दुसऱ्या छायाचित्रात पोलीस ठाण्यात ट्रकमधून गुटख्याचे खोके उतरविताना मजूर.

Web Title: Gurkha police seized 72 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.