गुरू, संताच्या शिकवणीवर जीवन जगावे : सुदीक्षाजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:09 PM2020-08-19T23:09:26+5:302020-08-20T00:23:11+5:30

सिडको : पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांना केले.

Guru, live life on the teachings of saints: Sudikshaji Maharaj | गुरू, संताच्या शिकवणीवर जीवन जगावे : सुदीक्षाजी महाराज

गुरू, संताच्या शिकवणीवर जीवन जगावे : सुदीक्षाजी महाराज

Next
ठळक मुद्देसंत निरंकारी मिशन : आॅनलाईन मुक्ती पर्व

सिडको : पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांना केले.
मुक्तीपर्व दिवसाच्या निमित्ताने गोविंद नगर येथील सत्संग भवन येथे आयोजित आॅनलाइन संत समागमामध्ये त्या बोलत होत्या. या आॅनलाइन संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक निरंकारी भक्तगणांनी सहभाग घेतला. संत निरंकारी मिशन दरवर्षी 15 आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना बरोबरच मुक्ति पर्व दिवस आयोजित करते .ज्यामध्ये मिशनचे अगोदरचे गुरु तसेच महान संतांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते. त्यामध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी, जगत माता बुद्धवन्तीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, पुज्य माता सविंदर हरदेवजी तसेच अशा अनेक भक्तांचा समावेशआहेज्यांनी मिशनचा सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश जना-जनापर्यंत पोचविण्यासाठी आपले जीवन वेचले ,असेही सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी सांगितलेप्रभू -परमात्म्याशी नाते जोडून जो सदाचारी जीवन जगतो तो मुक्तिचा अधिकारी बनतो. असेही त्या म्हणाल्या. या आॅनलाईन मुक्ती पर्व समागमामध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील निरंकारी मिशनच्या अनुयायांनी विचार, भक्तीरचना, भजन तसेच कवितांच्या माध्यमातून मिशनच्या पूर्वसूरिना आपली श्रद्धासुमने अर्पण करण्याबरोबरच त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली.

Web Title: Guru, live life on the teachings of saints: Sudikshaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.