गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
By admin | Published: July 21, 2016 12:38 AM2016-07-21T00:38:54+5:302016-07-21T00:46:19+5:30
गुरुपौर्णिमा : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, गुरुकुलांमध्ये गुरूंना वंदन!
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिमपट्ट्यातील आराध्यदैवत व कसमादे परिसरातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. परिसरातील व विविध ठिकाणांहून आलेल्या अनेक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. कपालेश्वर देवस्थानचे मठाधिपती पोपट नाना महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाले.
पंचक्राशीतील भाविक व विविध ठिकाणांहून उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत कपालेश्वर मंिदराचे मठाधिपती पोपट नाना महाराज यांना गुरूचे स्थान देऊन गुरुपूजनासह पादुकांचेही पूजन करण्यात आले.
गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गुरू हा आपल्या जीवनातील मुख्य मार्गदर्शक असतो. गुरूचा आपण नेहमी आदर केल्यास त्याचे फळ निश्चित मिळतेच, असे मठाधिपती पोपट नाना महाराज यांनी सांगितले. रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी प्रवचन झाले व रात्री ३ वाजता अनंत महाराज कजवाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्र म ठेवण्यात आला होता. चंद्रकात महाराज डोंगरगावकर, बाबूराव महाराज जोरणकर, नामदेव महाराज रातीर, गंगाधर महाराज रातीर, गोरख महाराज (विठेवाडी), आण्णा महाराज कंधाणेकर, पप्पू महाराज विंचुरे, काकाजी महाराज विंचुरे, रामदास आप्पा डांगसौंदाणेकर, आंबादास महाराज निकवेलकर, मृदंगाचाय भूषण महाराज नाशिककर, टाळेकरी यांच्यासह जोरण, विंचुरे, कंधाणे, किकवारी, निकवेल, रातीर, डांग सौंदाणे, वटार, डोंगरगाव, जोरण येथील तरुण मित्रमंडळ व तसेच कसमादे परिसरातील संतप्रेमी व भाविकांनी हजेरी लावून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
गंंगावे विद्यालय :
चांदवड तालुक्यातील गंगावे येथील संत जनार्दनस्वामी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काजीसांगवी आरोग्य विभागाचे अधिकारी डी. एम. पाटील व एस. के. मिसर उपस्थित होते. त्यांनी हात प्रक्षालण व विविध आजारांची लक्षणे व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांतर्फे शुभम गांगुर्डे, अभय पवार, स्वाती गाढे, रोहिणी नरोटे, ओम शेलार, साक्षी शेलार, पूजा गाढे, सुरज कुंभार्डे यांनी गुरूंबद्दल माहिती दिली. इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी गीत सादर केले. मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे यांनी गुरू-शिष्य नात्याची माहिती सांगितली. सूत्रसंचालन श्रीमती एस. व्ही. गायकवाड यांनी केले. जी. एन. गायकवाड यांनी आभार मानले.
चंद्रेश्वरगड : चांदवड : येथील चंद्रेश्वरगडावर चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या भक्तांनी गुरुपौणिमेनिमित्त स्वामी जयदेवपुरी महाराज यांचे पूजन करून आशीर्वाद घेतला. यानिमित्त भजन, कीर्तन, महाप्रसाद आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले. जगन्नाथ राऊत यांनी गुरू-शिष्य यांच्यातील नाते समजावून सांगितले. दिवसभर उत्सवासाठी भक्तांनी व महिलांनी गर्दी केली होती.
जनरल विद्यार्थी वसतिगृह : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित पुष्पाबाई विनोद ललवाणी जनरल विद्यार्थी वसतिगृहात गुरुपौर्णिमेनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सांस्कृतिक विद्यार्थी कला मंचतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता नववीतील शिरीष दुकळे होता, तर अर्णव पाटील याच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सूत्रसंचालन हर्षल निपाणी याने केले. याप्रसंगी विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक अंबादास काळे, शरद निकम, राजाभाऊ लुंकड, पवार, किशोर भामरे, गणेश गहिवाल, प्रकाश वैद्य, चेतन निकम यांनी गुरू-शिष्य यांच्यातील नात्याची माहिती दिली.
जनता विद्यालय लोहोणेर : येथील जनता विद्यालयात गुरु -शिष्याच्या नात्याची महती सांगणारी गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. टी. चव्हाण होते. ज्येष्ठ शिक्षक व्ही. के. वाघ, जी.ई. बावा, यू. के. भदाणे, बी.जी. सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते व्यासमुनींच्या व सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील सर्व गुरु जनांचा पुष्प व पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे विद्यार्थी दिव्या साखरे, प्रसाद महाजन, प्रांजल खैरनार, अनुष्का सावळे, मयूरी अहिरे, अंकित शिंदे, अथर्व चौधरी आदिंनी मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. उपशिक्षक एस. पी. देवरे व उपशिक्षका व्ही. आर. मुदांनकर यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. टी. चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन दहावी ‘अ’ वर्गाचे विद्यार्थी प्रतीक्षा भावसार, सायमीन शेख, हर्षद धोंडगे, हर्षल बागुल यांनी केले. आभार सिद्धार्थ हिरे याने मानले. कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक व्ही. डी. पवार व एस. बी. एखंडे यांनी केले होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षकांसह व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तिलकेश्वर इंग्लिश स्कुलमध्ये गुरु पोर्णिमा
जोरण : बागलाण तालुक्यातील तिळवण येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सटाणा संचलित तिलकेश्वर इंग्लिश स्कूल विद्यालयात विविध कार्यक्र मांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. ह्याळीज यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी गुरु पौर्णिमाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून गुरूंचे जीवनातील महत्त्व सांगितले. कार्यक्र माचे संयोजन शिक्षक श्रीमती खैरणार व भामरे यांनी केले होते. मुख्याध्यापक डी. डी. ह्याळीज यांनी विद्यार्थिनींना गुरु -शिष्याचे नाते व जीवनातील गुरूंचे महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले.