जिल्ह्यातील वसतिगृहांच्या अधीक्षकांची गुरु वारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:05 AM2018-01-16T00:05:34+5:302018-01-16T00:11:08+5:30

नाशिक : जिल्ह्णातील वसतिगृहांना मिळणाºया सेवा सुविधा तसेच अडीअडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर या गुरुवार, दि. १८ रोजी दुपारी १२ वाजता वसतिगृहांच्या अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदर बैठक होणार असून, बैठकीत वसतिगृहाच्या कामकाजाचा आढावादेखील घेणार आहेत.

Guru Wali meeting of the Superintendents of the hostels of the district | जिल्ह्यातील वसतिगृहांच्या अधीक्षकांची गुरु वारी बैठक

जिल्ह्यातील वसतिगृहांच्या अधीक्षकांची गुरु वारी बैठक

Next
ठळक मुद्दे समाज कल्याण सभापती घेणार आढावा वस्तूंचा दर्जा, भोजन आदींची माहिती घेतली जाणार

नाशिक : जिल्ह्णातील वसतिगृहांना मिळणाºया सेवा सुविधा तसेच अडीअडचणींची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर या गुरुवार, दि. १८ रोजी दुपारी १२ वाजता वसतिगृहांच्या अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदर बैठक होणार असून, बैठकीत वसतिगृहाच्या कामकाजाचा आढावादेखील घेणार आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत समाजकल्याण विभागाचे जिल्ह्णात १२५ मुले आणि मुलींचे वसतिगृह आहे. वसतिगृहाच्या कामकाजासह विद्यार्थ्यांना मिळणाºया सेवा-सुविधांचा सभापती चारोस्कर या आढावा घेणार आहेत. वसतिगृहासंदर्भात प्राप्त तक्रारी तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच अधीक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अशाप्रकारची पहिलीच बैठक जिल्हा परिषदेत घेण्यात येणार आहे. या बैठकीत सध्या असलेल्या सुविधा, वसतिगृहाची अवस्था, अनुदान, विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाºया वस्तूंचा दर्जा, भोजन आदींची माहिती घेतली जाणार आहे.
याबरोबरच कर्मचारी मानधनाबाबत असलेल्या तक्रारी, भाडेतत्त्वावरील जागेत असलेले वसतिगृह तसेच स्वमालकीच्या जागेत असलेल्या इमारतींचादेखील आढावा घेतला जाणार आहे. वसतिगृह संदर्भातील तक्रारी कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मिळणाºया सोयी-सुविधांबाबत असलेल्या तक्रारी कमी करण्यासाठी उपायोजन करण्यात येणार असल्याची माहिती सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिली.

Web Title: Guru Wali meeting of the Superintendents of the hostels of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक