गुरुचरित्र पारायण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:13 PM2020-01-10T23:13:19+5:302020-01-11T01:20:55+5:30

प.पू. रमन्नाथ महाराज बहुद्देशीय सेवा संस्था, तानसा व पेठ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील रानदेवी मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला.

Gurucharitra Parayan Ceremony | गुरुचरित्र पारायण सोहळा

पेठ येथे गुरुचरित्र पारायण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली पालखी.

Next

पेठ : प.पू. रमन्नाथ महाराज बहुद्देशीय सेवा संस्था, तानसा व पेठ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील रानदेवी मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला.
अलोकनाथ महाराज यांच्या उपस्थितीत हरिपाठ, प्रवचन, गुरुचरित्र गाथा, गोमातापूजन, माता-पितापूजन, गुरुपूजन आदी धार्मिक कार्यक्र म झाले. संजय महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता झाली. यावेळी शहरातून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. महाराष्ट्र व गुजरात राज्यातून भाविक सहभागी झाले होते. यावेळी डॉ. कमलेश भरसट, जयप्रकाश बेंडकोळी, महेंद्र पेठकर, नाना तुरेकर, सुनील कोरडे, अमित सुबंध, गोरख रहाणे, मुकुंद घोंगे, गिरिधर कस्तुरे, दादा गणोरे, अमोल निकम, सागर रहाणे, अनिकेत बोढाई आदी उपस्थित होते.

Web Title: Gurucharitra Parayan Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.