गुरुदत्त मंडळाने राखले सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:40 AM2019-08-29T01:40:35+5:302019-08-29T01:40:58+5:30
यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला.
लोकमत इनिशिएटिव्ह
नाशिक : यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला. मंडपाचा आकार कमी करून खर्चात बचत करण्यासह वाहतुकीचा अडथळा कमी करण्याबाबतही पुढाकार घेण्यात आला.
मंडळ दरवर्षी किमान ३८ फूट बाय ३० फूट अशा आकारात धार्मिक देखाव्याची आरास उभारणी करते. मात्र यंदाच्या वर्षी मंडपाचा आकार कमी करीत खर्च वाचवण्यासाठी ३० बाय २५ फूट आकाराच्या मंडपाची उभारणी केली आहे. अवाजवी खर्चाला फाटा देत तीच रक्कम पूरग्रस्तांना मदत कशी करता येईल, म्हणून मंडळातर्फेगणेश स्थापना व विसर्जन मिरवणूक खर्चातदेखील घट करण्यात आली आहे. तसेच कार्यक्र माला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना देण्यात येणाºया शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ खर्चातदेखील यंदा कपात करण्यात आली आहे.
यंदा मंडळाने पाच विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा चार रु ग्णांचा आॅपरेशनचा खर्च देण्यात आला.
कालसुसंगत बदल व्हावेत
लोकमान्य टिळक यांनी जनशक्ती आणि संघटनातून ब्रिटिशांविरुद्ध रान उठवता यावे, या उद्देशाने सुरू केलेल्या गणेशोत्सवात अनेक बदल घडले. त्यामुळे आतादेखील समाजातील नेतृत्वाने गणेशोत्सवातील मंडपांचे आकार आणि त्यावरील खर्चाबाबत कालसुसंगत बदल करावेत. उत्सवाच्या स्वरूपात बदल करणे ही काळाची नितांत गरज बनलेली असून सर्वच मंडळांनी त्याबाबत गांभीर्याने विचार करावा.
- वनाधिपती विनायकदादा पाटील
गत ४३ वर्षांपासून मंडळ सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्र मांमध्ये सहभागी होत असते. मंडळाच्या वतीने अवाजवी खर्च टाळत जमा झालेल्या वर्गणीतून जमा ५१ हजार रु पयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला आहे.
- गुलाब भोये, संस्थापक अध्यक्ष,
गुरु दत्त शैक्षणिक, सामाजिक कला व क्रीडा मंडळ