गुरूजनांनी साकारले स्वराज्य.... दुर्गजागृती : पेठ तालुक्यातील शिक्षकांनी साकारले गड-किल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:04 PM2018-01-01T13:04:45+5:302018-01-01T13:05:56+5:30
रामदास शिंदे, पेठ बारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साधन. आपली चिमुकली या गुरूकुलात ज्ञानार्जन करतात म्हणजे सर्वासाठीच शाळा प्रियच म्हणून रस्त्यावरून जातांना नजरा नकळत शाळेकडे वळतात.
रामदास शिंदे, पेठ
बारवपाडा हे पेठ तालुक्यातील अतिदुर्गम असे पाडे वजा लहानसे टूमदार गाव. गावकºयांची रोजची सकाळ नेहमीप्रमाणे कौटुंबिक कामकाजाने सुरू होणारी. करमणूकीचे फारसे साधने नसल्याने गावातील शाळा व शिक्षक हेच गावकºयांचे जगाच्या संपर्काचे एकमेव साधन. आपली चिमुकली या गुरूकुलात ज्ञानार्जन करतात म्हणजे सर्वासाठीच शाळा प्रियच म्हणून रस्त्यावरून जातांना नजरा नकळत शाळेकडे वळतात.
लगबगीने शेतावर जाणाºया येणाºयांच्या नजरा शाळेकडे गेल्या आणी अचानक स्थिरावल्याही. नेहमीप्रमाणे शाळकरी पाखरांची किलिबल आज जाणवत नव्हती. त्याऐवजी शाळेचे क्रि डांगण वेगळ्याच धावपळीत गुंतले होते. जिकडे तिकडे टिकाव फावडयांचा निनाद, दगड, विटा, माती, खडी, लाकूड, पुठ्ठा आणी मिळेल त्या वस्तूची नुसती देणघेण. कोणाचा रायगड रु प घेतोय तर कोणाचा शिवनेरी.एकीकडे प्रतापगडाचा रु बाब तर दुसरीकडे कोंडाण्याची शान.
निमित्त होते पेठ तालुक्यातील जोगमोडी बीटअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षण परिषदेचे. एरवी शिक्षकांच्या प्रशिक्षण व कार्यशाळामध्ये केवळ प्रशासकिय परिपत्रके, सुचना व वरिष्ठांच्या आदेशाचा बडीमर असतांना बारवपाडा येथील शिक्षण परिषदेत विस्तार अधिकारी सुनिता जाधव यांच्या संकल्पनेतून शिक्षकांसाठी किल्ले निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.आपल्या दैनंदिन अध्यापनात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास शिकवत असतांना या स्वराज्याचे भूषण असणाºया प्रमुख दहा किल्लांची प्रतिकृती साकार करण्याची संधी गुरु जनांना मिळाली.आपल्या मनातील कल्पनांना व सुप्त गुणांना वाव देत शिक्षकांनी गडिकल्यांच्या शाश्वत प्रतिकृती साकारल्या. दरवाजे, महादरवाजे,माची, बुरु ज, तटबंधी, कोठार, चोरवाटा यासह गडावरील बारीकसारीक बाबी हुबेहुब दाखवण्याचा शिक्षकांचा ज्ञानरचनावाद साकारला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध साहित्याचा वापर करून जीव ओतून साकारलेल्या गडावर भगवा फडकवतांना प्रत्येकाची छाती भरून आली. शाळेच्या परिसरात जणू काही स्वराज्य अवतरल्याचे जाणवत होते.