न्यायालयात हजर राहण्याचे भिडे गुरुजींना समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:55 AM2018-09-01T00:55:19+5:302018-09-01T00:55:48+5:30
नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांनी शुक्रवारी (दि़३१) दिले़ येत्या २८ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समार्फत भिडे यांना बजावले जाणार आहेत़
नाशिक : नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांनी शुक्रवारी (दि़३१) दिले़ येत्या २८ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समार्फत भिडे यांना बजावले जाणार आहेत़ भिडे गुरुजी यांच्याविरोधात नाशिक महापालिकेने खटला दाखल केला असून, त्यावर आज झालेल्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले़
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, ७ आॅगस्ट रोजी प्रथम सुनावणीसाठी ठेवले होते़ यानंतर १० आॅगस्ट, २४ आॅगस्ट या दोन्ही तारखांना भिडे न्यायालयात हजर राहिले नाहीत़ भिडे यांनी न्यायालयात हजर रहावे यासाठी ३१ आॅगस्ट ही तारीख ठेवण्यात आली होती़ न्यायाधीश पांडे हे रजेवर असल्याने पंकजा धांडे यांच्या न्यायालयात सुनावणी होती़ मात्र, भिडे आजही न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात समन्स काढण्याचे आदेश धांडे यांनी दिले़ सरकारी वकील जाधव यांनी भिडे यांना समन्स काढण्याची मागणी न्यायालयाकडे केली, तर संभाजी भिडे यांचे वकीलपत्र अॅड़ अविनाश भिडे यांनी घेतले आहे़
आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले. परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने यासंदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला़
नाशिकममधील १० जून रोजी झालेल्या सभेत आंबे खाल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते़ या वक्तव्याबाबत ‘लेक लाडकी अभियानह्णतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास सदरील वक्तव्याची खातरजमा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त संचालकांनी दिले होते.