कर्णबधीर विद्यार्थ्यांशी जुळले गुरु जींचे भावनिक ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:34 PM2019-09-24T18:34:54+5:302019-09-24T18:35:48+5:30

आपण तर कान,नाक,डोळे या सगळ्या इंद्रियांनी धडधाकट आहोत पण ज्यांच्या जगण्यातच कशाची तरी उणीव आहे. अशा मूकबधिर विद्यार्थ्यांचे जगणं कसं हे समजून घेताना बाभूळगाव येथील एस.एन. डी. इंग्लिश मीडियम पिब्लक स्कूलच्या शिक्षकांचे या कर्णबधिर विद्यार्थ्यांशी भाविनक नाते तयार झाले.

Guruji's emotional bond with the hearing impaired students | कर्णबधीर विद्यार्थ्यांशी जुळले गुरु जींचे भावनिक ऋणानुबंध

अंगणगाव येथील मायबोली कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थ्यासोबत एसएनडी इंग्लिश मिडीयमचे शिक्षक.

Next
ठळक मुद्देमायबोली विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा एक दिवस

येवला : आपण तर कान,नाक,डोळे या सगळ्या इंद्रियांनी धडधाकट आहोत पण ज्यांच्या जगण्यातच कशाची तरी उणीव आहे. अशा मूकबधिर विद्यार्थ्यांचे जगणं कसं हे समजून घेताना बाभूळगाव येथील एस.एन. डी. इंग्लिश मीडियम पिब्लक स्कूलच्या शिक्षकांचे या कर्णबधिर विद्यार्थ्यांशी भाविनक नाते तयार झाले..
ही नात्यांची गुंफण जुळविण्यासाठी निमित्त ठरले ते अंगणगाव येथील समता प्रतिष्ठान संचिलत मायबोली विद्यालयातील कर्णबधीर शाळेला दिलेल्या भेटीचे. दैनंदिन जीवनात शिक्षक म्हणून काम करत असताना व्यस्त दैनंदिनी पलीकडे जाऊन एक अनोखा दिवस काढून एक दिवस त्यांनी मायबोली कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत घालवला. शिक्षकांनी तर आमच्या जीवनातील हा अद्भुत दिवस असल्याची प्रतिक्रि या व्यक्त केली. दैनंदिन शिक्षण पद्धतीच्या व्यतिरिक्त कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणात येणार्या अडचणी तसेच त्यांच्यासाठी वापरल्या जाणार्या विविध शैक्षणकि शिक्षणपद्धतीचा आज शिक्षकांनी अभ्यास केला. तसेच त्या पद्धतीसाठी वापरले जाणारे शैक्षणकि साधने यांची देखील माहिती मायबोलीचे प्राचार्य बाबासाहेब कोकाटे यांच्याकडून घेतली. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वापरली जाणारी पद्धत,घेतले जाणारे परिश्रम त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवली.
यावेळी एस.एन.डी. इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य निलेश शिंदे,उपप्राचार्य बंड,संदीप पाटील आदि उपस्थित होते. या खेळातून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करून त्यांच्या मधील विजेत्या विद्यार्थ्यांना बिक्षसे प्राचार्यांच्या हस्ते देण्यात आली. संस्थेचे संचालक रु पेश दराडे यांनी या उपक्र माचे कौतुक केले.
बिस्कीट खाण्याची स्पर्धा,संगीत खुर्ची,कबड्डी स्पर्धा रंगल्या
सर्व शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्र म घेऊन त्यांच्यासाठी खेळीमेळीचे वातावरणात उपक्र मातून शिक्षण पद्धती कशाप्रकारे सोपे केले जातात हे श्री.कोकाटे यांनी शिक्षकांना समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी बिस्कीट खाण्याची स्पर्धा,संगीत खुर्ची,कबड्डी, घरामध्ये रिंग फेकणे,बादलीत बॉल टाकणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

 

Web Title: Guruji's emotional bond with the hearing impaired students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.