शाळापूर्व तयारीत गुरुजींची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 09:19 PM2020-06-22T21:19:32+5:302020-06-22T22:56:51+5:30

नाशिक : शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या पार्श्वभूमीवर शाळा पूर्वतयारी पंधरवडा राबवताना गुरुजींची कसरत सुरू आहे. विशेषत: जिल्ह्यातील आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांनी करावयाच्या पूर्वतयारीत अनेक कामांच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्या असून विद्यार्थ्यांशी नियमित संपर्कात राहतानाच त्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक नियोजनाबाबतही काळजी वाहावी लागत आहे.

Guruji's exhaustion in pre-school preparation | शाळापूर्व तयारीत गुरुजींची दमछाक

शाळापूर्व तयारीत गुरुजींची दमछाक

Next
ठळक मुद्देकोविडचे आव्हान : अनेक जबाबदाऱ्यांमुळे वाढली कसरत; पाठ्यपुस्तकेही घरपोच पोहोचवावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या पार्श्वभूमीवर शाळा पूर्वतयारी पंधरवडा राबवताना गुरुजींची कसरत सुरू आहे. विशेषत: जिल्ह्यातील आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांनी करावयाच्या पूर्वतयारीत अनेक कामांच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्या असून विद्यार्थ्यांशी नियमित संपर्कात राहतानाच त्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक नियोजनाबाबतही काळजी वाहावी लागत आहे. दरम्यान, निवासी आश्रमशाळांचा आजवरचा लौकीक पाहता कोविडच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखण्याचे मोठे आव्हानही उभे ठाकले आहे.
शासनाने ग्रामीण भागात ज्याठिकाणी महिनाभर कोविडचा रुग्ण आढळला नाही, अशा ठिकाणी १ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या-त्या भागातील परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर नियोजन करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. जुलै २०२० पासून शाळा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील आश्रमाशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ जूनपासूनच कामावर हजर केले आहे तर एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांना २२ जून पासून हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
प्रत्यक्ष विद्यार्थी शाळांमध्ये येण्यापूर्वी शाळांमध्ये करावयाच्या पूर्वतयारीबाबतच्या सूचना शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना दिल्या आहेत. ते नियोजन करताना गुरुजींची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. शासनाच्या निर्णयानुसार, सर्व पाठ्यपुस्तके घरपोच विद्यार्थ्यांना नेऊन पोहोचविण्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. याशिवाय शाळा प्रवेशाबाबतही कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.
शाळा प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत शाळेमधूनच विदद्यार्थ्यांशी नियमित संपर्काचेही आव्हान गुरूजींपुढे आहे. त्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध शैक्षणिक संस्था यांचा मदत घेण्याची सूचना करण्यात आली असली तरी तो संपर्क साधताना कसरत करावी लागत आहे. आरोग्यविषयक नियोजनआश्रमशाळा अथवा एकलव्य निवासी शाळा सुरू होण्यापूर्वी ज्या आश्रमशाळांचा वापर कोरोना विलगीकरण केंद्रांसाठी करण्यात आलेला आहे, अशा वर्गखोल्या ताब्यात घेण्यापूर्वी त्या संपूर्ण निर्जंतूक कराव्या लागणार आहेत. पेठ तालुक्यातील १५ निवासी शाळांपैकी ४ निवासी शाळा या विलगीकरण केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या अद्याप शासनाच्याच ताब्यात आहेत. याशिवाय, शाळा सुरू झाल्यानंतर आवारात विविध ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन्स उभारावी लागणार असून त्याठिकाणी पूर्णवेळ साबण उपलब्ध करून दद्यावे लागणार आहेत. विद्यार्थी शाळेत येईपर्यंत त्यांना शैक्षणिक व आरोग्यविषयक मदत करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान..................

इयत्ता ९ वी १२ वीच्या विदद्यार्थ्यांना वरील वर्गांमध्ये प्रवेश दिला गेल्यामुळे कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे त्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे नियोजन अत्यंत काटेकोर व सखोलपणे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक गावात विदद्यार्थ्यांमध्ये संपर्क करताना पालकांसह समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचीही जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.स्वच्छतेचे कसे होणार?आश्रमाशाळांमधील स्वच्छतेबाबतचा प्रश्न नेहमीच चर्चिला जात असतो. विशेषत: तेथील भोजन व्यवस्थेबाबत नेहमीच तक्रारींचा सूर असतो. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर निवासी आश्रमशाळांमध्ये स्वच्छता राखण्याचे मोठे आव्हान शाळा व्यवस्थापनासमोर असणार आहे. मुलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्यांना ताजा भाजीपाला, फळे पुरविण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचेही आव्हान असणार आहे.

Web Title: Guruji's exhaustion in pre-school preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.