मंदिरांमध्ये गुरूपूजन सोहळा

By Admin | Published: July 10, 2017 12:44 AM2017-07-10T00:44:54+5:302017-07-10T00:45:44+5:30

नाशिक : ‘जय जय, जय गुरूदेवा’ आणि जयदेव गुरूदत्त असा जयघोष करीत गुरूपूजनासह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाली.

Gurupurujan ceremony in temples | मंदिरांमध्ये गुरूपूजन सोहळा

मंदिरांमध्ये गुरूपूजन सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘जय जय, जय गुरूदेवा’ आणि जयदेव गुरूदत्त असा जयघोष करीत शहरातील विविध मंदिरांमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजनासह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाली.
गोदाघाटानजीक असलेल्या एकमुखी दत्तमंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त सकाळी रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त मंदिराची फुलांनी सजावट केली होती. यावेळी अभिषेक, महाप्रसाद आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गंगापूररोडवरील लोकतीर्थ आश्रमात ढेकणे महाराजांच्या शिष्यांच्या वतीने सकाळी धान्यधारणा करण्यात आली. त्यानंतर जप, आरती, प्रसाद आणि कार्यक्रम झाले. आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच जय जय स्वामी समर्थचा मंत्र जपत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. 
जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आडगाव, ओझर मार्गावरील आश्रमात गुरूपौणिमेनिमित्त बालसंस्कार शिबिर जपानुष्ठान, हस्तलिखित नामजप, भावगत, वाचन, प्रवचन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालेश्वर येथील महादेव मंदिरात पहाटे जनार्दन स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पाद्यपूजन व सदगुरू दर्शन सोहळा झाला.
विश्वजागृती मिशन
विश्वजागृती मिशनचे संस्थापक सुधांशू महाराज यांचा गुरूपौर्णिमा महोत्सव समर्थ मंगल कार्यालय वसंत मार्केट कॉनडा कॉर्नर येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त सुधांशू महाराज यांच्या चरणपादुका, पूजन, ओंकारजप, प्रभूस्मृती, सामुदायिक प्रार्थना, समधुर भजन संध्या आरती, महाप्रसाद आदिसह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ओंकारसिंह राजपूत, नागरे, भालचंद्र राणे, विठ्ठल शिंपी, रमेश कासार आदि उपस्थित होते.

Web Title: Gurupurujan ceremony in temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.