गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:24 AM2018-07-28T00:24:46+5:302018-07-28T00:25:13+5:30
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वर:... या महतीनुसार गुरुपौणर््िामेनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वंदन केले. मविप्र वाघ गुरुजी मंदिर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक पी.पी. लांडगे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
नाशिक : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वर:... या महतीनुसार गुरुपौणर््िामेनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वंदन केले. मविप्र वाघ गुरुजी मंदिर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक पी.पी. लांडगे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रामदास स्वामी-शिवराय, द्रोणाचार्य-एकलव्य अशी गुरुशिष्याची वेशभूषा केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. अर्चना देवरे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली गावित यांनी गुरुशिष्य नात्यांबदल माहिती सांगितली.
आडगाव विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
आडगाव : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करून गुरूजनांना मानवंदना दिली. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. बी. हिंडे होते. यावेळी मुख्याध्यापक एम. बी. हिंडे, पर्यवेक्षक व्ही. व्ही. काकळीज यांसह सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रणाली शिंदे, वैष्णवी लचके, ऐश्वर्या गोसावी, रागिणी लभडे, सानिका माळोदे उर्वशी जोगी, तनुजा जाधव, श्रावणी ढेरिंगे, प्रिया दूधवडे, मोनाली भुक्तर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील उपशिक्षक जे.पी. धूम यांनी महर्षी व्यास यांच्याविषयी माहिती देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन गौरी सोनवणे व भूमिका खरे हिने केले, तर आभार जागृती भदाणे हिने मानले.
रचना विद्यालय
रचना विद्यालय प्राथमिक विभागात पालक-शिक्षक संघातर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक वनिता जगताप यांच्या हस्ते गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वाती शिरोडे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर शोभा कोठावदे, अशोक बाविस्कर, कैलास जाधव, यशवंत चौरे आदी उपस्थित होते.
शालोपयोगी साहित्य वाटप
पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्र मांक ३ च्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त हिरावाडी मनपा शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पूनम मोगरे, रु ची कुंभारकर, मुख्याध्यापक सुनंदा चौधरी, दिगंबर मोगरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्र माला ज्योती गिते, शोभा दिवे, प्रियंका मोरे, पूनम जाधव, राहुल देशमुख आदींसह नागरिक उपस्थित होते.