गुरुजनांचे संस्कार कायमस्वरूपी टिकतात : वेदश्री थिगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:54 AM2019-09-10T00:54:59+5:302019-09-10T00:55:19+5:30
माता-पित्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या गुरुजनांनी केलेले संस्कार हेच कायमस्वरूपी टिकतात आणि त्यातून सुदृढ भावी पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.
नाशिक : माता-पित्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या गुरुजनांनी केलेले संस्कार हेच कायमस्वरूपी टिकतात आणि त्यातून सुदृढ भावी पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.
सोमवारी (दि.०९) मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयाच्या ४५वा शिक्षक गौरव समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे होते. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष तिडके, सत्कारार्थी शिक्षक ज्योती काळोगे, कल्पना पाटील, जनार्दन गायकवाड, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कारभारी गावले, वाचनालयाचे संचालक देवराम पवार, बाळासाहेब ताजणे आदी उपस्थित होते. यावेळी मविप्र संचालक सचिन पिंगळे, नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विलास आव्हाड, बंडूनाना दराडे, मुख्याध्यापक नीलम घुले, निवृत्ती महाले, देवराम पवार, सुभाष काकड, राका माळी, संजय गामणे, संजय काकड, तुकाराम तांबे, शंकर पिंगळे, गोविंद तिडके, डी. सी. माळी आदी उपस्थित होते. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक गोकुळ काकड यांनी, तर आभार संजय फडोळ यांनी मानले.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षिका ज्योती काळोगे, कै. नारायणराव मानकर प्रायमरी स्कूलच्या उपशिक्षिका कल्पना पाटील, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक जनार्दन गायकवाड यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ग्रंथभेट स्वरूपात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय पत्रकार संघाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शोभा आरोटे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.