शहरात सर्रास गुटखा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:00+5:302021-03-22T04:14:00+5:30
मिरचीचे दर वाढल्याने नाराजी नाशिक : यावर्षी मिरची मसाल्याचे दर वाढल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी मसाल्यासाठी ...
मिरचीचे दर वाढल्याने नाराजी
नाशिक : यावर्षी मिरची मसाल्याचे दर वाढल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी मसाल्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चात यावेळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. अनेकांना यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
खोदकामांमुळे व्यवसायिकांमध्ये नाराजी
नाशिक : गोदाघाट परीसरात सुरू असलेल्या खोदकामांमुळे या परिसरात व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याचा व्यवसायावरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी परिसरातील व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
दुकानदारांना समज देण्याची मागणी
नाशिक : रात्री सातनंतर दुकाने बंद करावीत असे जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही अनेक परिसरातील दुकाने सातनंतरही सुरू राहात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या दुकानांच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्यांना पोलिसांनी समज द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर काही पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी अनेक वाहने भरधाव वेगाने जात असतात. यामुळे दुचाकीस्वारांचा गोंधळ होतो. हे पथदीप त्वरित सुरू करावेत अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना ग्राहकांचा प्रतिसाद
नाशिक : जेल रोड परिसरात असलेल्या भाजीबाजारात दिवसेंदिवस विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. परिसरातील खेडेगावांमधील शेतकरीही या ठिकाणी गाडी उभी करून भाजीपाला विक्री करताना दिसतात. यामुळे येथील भाजीबाजार वाढत आहे. शेतकऱ्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.