वणी येथे ९० हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:19 PM2019-09-28T17:19:55+5:302019-09-28T17:20:05+5:30
वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील वजनकाट्यालगत असलेल्या झोपडीत विशेष पोलीस पथकाने धाड टाकून ९० हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावरील वजनकाट्यालगत असलेल्या झोपडीत विशेष पोलीस पथकाने धाड टाकून ९० हजारांचा गुटखा जप्त केला आहे. वणी शहरासह परिसरात अनेक दिवसांपासून राज्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्र ी खुलेआम होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या विशेष पोलीस पथकाच्या अधिकाऱ्यांनी वणी-पिंपळगाव रस्त्यावरील वजन काटा परिसरात एका झोपडीत धाड टाकली. तेथे तपासणी केली असता गुटख्याचा बेकायदा साठा आढळला. नवाज नूर शेख (रा. वणी) असे संशयिताचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी जप्त केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची मोजदाद केली. नवाज शेख याचाच हा माल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईनंतर गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, गुटखा नेमका कोठून आणला जातो व मूळ स्रोत शोधणे गरजेचे असल्याचा सूर यावेळी नागरिकांमधून उमटला होता.