गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात गुटखा तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:43 PM2020-12-22T18:43:04+5:302020-12-22T18:43:55+5:30
वणी : गुजरात राज्यातील सेल्वासा येथुन नाशिक येथे गुटखा व सुगंधित मसाला वाहतुक करणारा ट्रक दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाट्याजवळ पकडुन सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन संशयीतास अटक केली आहे.
वणी : गुजरात राज्यातील सेल्वासा येथुन नाशिक येथे गुटखा व सुगंधित मसाला वाहतुक करणारा ट्रक दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाट्याजवळ पकडुन सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन संशयीतास अटक केली आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखु तसेच गुटखा पावडर स्वतःच्या कब्जात बाळगुन, साठवणुक करुन असुरक्षित,आरोग्यास अपायकारक असलेल्या नमुद पदार्थाची वाहतुक के ए ५६ ३८१४ या ट्रकमधुन करत असताना दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाटा परिसरात हा ट्रक पकडुन तपासणी केली असता नमुद माल त्यातआढळुन आला.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांच्या फिर्यादिवरुन ट्रक चालक दत्तात्रय रामलींग जामदार (३८, मु. पो. सस्तापुर तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात व महाराष्ट्राचे गुटखा कनेक्शन या कारवाईमुळे उघड झाले असुन या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठीचा तपास दिंडोरी पोलीसांचा सुरु आहे.