सव्वा कोटीचा गुटख्याचा साठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 01:25 AM2021-01-18T01:25:37+5:302021-01-18T01:27:22+5:30

राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर प्रतिबंध असतानासुद्धा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने राजस्थानमधून दोन कंटेनर भरून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला.

Gutkha stock of Rs | सव्वा कोटीचा गुटख्याचा साठा हस्तगत

सव्वा कोटीचा गुटख्याचा साठा हस्तगत

Next
ठळक मुद्देचौघे संशयित ताब्यात : राजस्थानच्या दोन कंटेनरमधून अवैध वाहतूक

नाशिक : राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर प्रतिबंध असतानासुद्धा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने राजस्थानमधून दोन कंटेनर भरून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला. वणीजवळील करंजखेड फाट्यावर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून हे कंटेनर रोखले. सुमारे एक कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा या कंटेनरमधून जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा नाशिक-सापुतारा मार्गावरून वणी येथून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. 
या माहितीच्या आधारे त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील राजपूत सचिन पाटील यांना सापळा रचण्याचे 
आदेश दिले. करंजखेडजवळील फाट्यावर पोलिसांनी शनिवारी (दि.१६) रात्री सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनर (आरजेजीए ३९१४) आणि दुसरा कंटेनर (आरजे ३० जीए ३८२४) एकापाठोपाठ आले असता पोलिसांनी शिताफीने ते रोखले. 
या दोन्ही कंटेनरची पथकातील पोलिसांनी झडती घेतली असता यामध्ये मिराज कंपनीचा राज्यात विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. यामुळे पोलिसांनी तत्काळ या दोन्ही कंटेनरचे चालक, वाहक संशयित महेंद्रसिंह, शंबुसिंहानी सोलंकी (३८, रा. उदयपूर), श्यामसिंग चतुरसिंह राव (४४), अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत (५६, दोघे, रा. बिदसर, चितोडगड), लोगल मेहवाल (४८,रा. उदयपूर) यांना गुटख्याची नाशिकमार्गे राज्यात विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी ताब्यात घेतले. 
त्यांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेले दोन्ही मोठे कंटेनर जप्त केले आहेत. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे एक कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० 
रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला
आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha stock of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.