वणीलगत ४९ लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:22 PM2020-09-09T23:22:40+5:302020-09-10T01:15:52+5:30
वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे जाणारा अवैध गुटखा व तंबाखु असा ४९ लाख रु पयांचा ऐवज स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्याने गुटखा तस्करामधे खळबळ उडाली आहे.
वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथुन महाराष्ट्रातील पुणे येथे जाणारा अवैध गुटखा व तंबाखु असा ४९ लाख रु पयांचा ऐवज स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्याने गुटखा तस्करामधे खळबळ उडाली आहे.
याबाबतची प्राप्त माहीती अशी, गुजरातमधुन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात बेकायदेशीर गुटखा वाहतुक व विक्र ी करण्यात येत असल्याची माहीती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा लावण्यात आला. वणी दिंडोरी रस्त्यावरील संखेश्वर मंदीराजवळ एमएच १२- ४५७५ क्र मांकाचे आयशर वाहन या ठिकाणी आले असता पोलीसांनी त्याची तपासणी केली. या वाहनात १८० बॉक्समधे हा बेकायदा गुटख्याचा अवैध साठा आढळुन आला. गुजरात मधुन महाराष्ट्रात बेकायदा गुटखा वाहतुक व विक्र ी करण्यात येते याबाबत अनेकदा तक्रारी होत होत्या.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, रामभाऊ मुंढे, दीपक अहीरे, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, प्रकाश तुपलोंढे, हनुमंत महाले, संजय गोसावी, अमोल घुगे, प्रविण सानप, रमेश काकडे, विकी म्हस्के, गणेश वराडे, वसंत खांडवी यांच्या पथकाने ही मोहीम पार पाडली.
दरम्यान गुटखा वाहतुक करणाऱ्या या वाहनाच्या अग्रभागी असलेल्या काचेवर औषधै अत्यावश्यक सेवा असा उल्लेख असलेला कागद लावण्यात आला होता. वणी - सापुतारा रस्त्यावरु न गुटख्याचे वाहतुक करणारे वाहन दुपारच्या सुमारास आले तेव्हा सापुतारा चौफुलीवर वणी पोलीस ठाण्याचा केवळ एकच पोलीस कार्यरत होता.