पेठ नजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:21 PM2019-09-28T18:21:23+5:302019-09-28T18:21:53+5:30

पेठ : स्थानिक गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पेठ तालुक्यातील सावळघाटानिजक गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशरमधील विमल कंपनीचा तब्बल ४४ लाख ४० हजार रूपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला असून यानिमित्ताने गुजरात राज्यातून अवैद्यरित्या अंमली पदार्थाच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Gutkha worth Rs. 5 lakh seized near Peth | पेठ नजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त

पेठ नजीक ४४ लाखांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : गुजरात राज्यातून अवैद्य गुटख्याची वाहतूक

पेठ : स्थानिक गुन्हे शाखेच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पेठ तालुक्यातील सावळघाटानिजक गुजरातकडून नाशिककडे येणारा आयशरमधील विमल कंपनीचा तब्बल ४४ लाख ४० हजार रूपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला असून यानिमित्ताने गुजरात राज्यातून अवैद्यरित्या अंमली पदार्थाच्या वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंग जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावरील गस्ती वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खबरीवरून गुजरात राज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत पेठ - नाशिक मार्गाने गुटख्याची तस्करीची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षीक आरती सिंग, अप्पर पोलीस अधिक्षीक शर्मीष्ठा वालावलकर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीसनिरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी यांचे पथकाने गुजरात राज्यातून येणारे संशयीत आयशर ट्रक (एचएच ०२, ईआर-५०१०) याची सावळघाट परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तपासणी केली.
पोलिस तपासणीत सदर गोण्यांमध्ये भरलेला विमल पानमसाला आढळून आला. वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मात्र गुन्हा दाखल करण्याचे प्रकीयेत अन्न व औषध प्रशासनास अहवाल सादर करण्यात आला.
या गस्तीपथकात पोलीस उपनिरिक्षक संजय पाटील, हवालदार राजू दिवटे, प्रकाश तुपलोंढे, दिपक आहिरे, हनुमंत महाले, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, पोलीस नाईक वसंत खांडवी, प्रविण सानप, अमोल घुगे जालींदर रवराटे, रमेश काकडे आदींचा समावेश होता.

फोटो -
28श्चद्गह्लद्ध01
पेठ तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या अवैद्य गुटखा व मुद्देमालासह नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Gutkha worth Rs. 5 lakh seized near Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.