श्रमिकनगरात गटाराचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:12+5:302021-02-16T04:16:12+5:30
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील आयटीआय कॉलनीत गटार तुंबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत ...
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील आयटीआय कॉलनीत गटार तुंबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत असून डासांची उत्पत्ती होत आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. श्रमिकनगर परिसरात एक नैसर्गिक नाला नागरी वसाहतीतून जातो. त्याच नाल्यात भुयारी गटाराचे घाण पाणी सोडले जाते. तेथे राहत असलेल्या नागरिकांना घाण पाण्याच्या वासाचा त्रास कित्येक दिवसांपासून सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी दिवसभरात त्याच रस्त्याने जात असतात. पण ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ते देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. ठोस पाऊल उचलून ही समस्या कायमस्वरुपी सोडवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अशोकनगर, राधाकृष्णनगर,विश्वासनगर या भागातही ही समस्या कायम आहे.
(फोटो १५ ड्रेनेज)