विहिरीचे काम बंद करणाऱ्या शेतकºयांवर लवकरच गुन्हे तहसीलदार : पाटोदा येथील विहिरी अधिग्रहित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:48 PM2019-02-17T23:48:00+5:302019-02-17T23:48:45+5:30

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Guwahati tehsildars soon to get rid of the wells of wells | विहिरीचे काम बंद करणाऱ्या शेतकºयांवर लवकरच गुन्हे तहसीलदार : पाटोदा येथील विहिरी अधिग्रहित करणार

विहिरीचे काम बंद करणाऱ्या शेतकºयांवर लवकरच गुन्हे तहसीलदार : पाटोदा येथील विहिरी अधिग्रहित करणार

Next
ठळक मुद्दे विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला.
यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.
ठाणगाव या गावाला पाटोदा येथील विहिरीवरून सुमारे १९७० पासून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र विहिरीचे पात्र हे उथळ असल्याने गेल्या काही वर्षांपासून या विहिरीचे पाणी कमी झाल्याने ग्रामस्थ पाणी टंचाईचा सामना करीत असल्याने शासनाने सुमारे पन्नास लाख रु पये निधी देऊन राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम करण्यास निधी दिल्याने ग्रामपंचायतीने सदरचे काम सुरु केल्याने पाटोदा येथील काही शेतकºयांनी हे काम बंद पाडल. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार वारुळे यांची भेट घेतली, त्यावेळी तहसीलदार यांनी सर्व संबधित खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन कागदपत्राची चौकशी केली व काम हे अधिकृत असल्याची खात्री केली. त्यानंतर विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश दिले.
यावेळी सरपंच सविता शेळके, उपसरपंच निर्मला शेळके, देविदास शेळके, रविंद्र शेळके, जनार्दन भवर, गणपत भवर, किशोर कोंढरे, देवचंद शेळके, भागवत शेळके, मारु ती नेहरे, कचरू चव्हाण, संजय शेळके, भाऊसाहेब शेळके, नवनाथ नेहरे, अनिता जाधव, उज्वला पिंपरकर, मंगला भवर, भामाबाई खुरासने, निर्मला चव्हाण, शोभा जाधव, इंदुबाई खुरासने, मंदाबाई शेळके, अनिता शेळके, तारा वाणी, बाबासाहेब वाणी, परीघा यादव, मिना खरे आदिंसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. 

Web Title: Guwahati tehsildars soon to get rid of the wells of wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर