गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 05:13 PM2019-12-25T17:13:57+5:302019-12-25T17:14:13+5:30

शुभवर्तमान : रोटरी क्लब नॉर्थचा पुढाकार

Gwaliwada School will get three classrooms | गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या

गवळीवाडा शाळेला मिळणार तीन वर्गखोल्या

googlenewsNext
ठळक मुद्देगवळीवाडा शाळेच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी लोकमतने लक्ष वेधले होते.

दिंडोरी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गवळीवाडा प्राथमिक शाळेला रोटरी क्लब नॉर्थ नाशिक यांच्या माध्यमातून तीन वर्ग खोल्या बांधून दिल्या जाणार असून या वर्गखोल्यांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
गवळीवाडा शाळेच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी लोकमतने लक्ष वेधले होते. शाळेला वर्गखोल्या मिळाव्यात म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेतील मुख्याध्यापिका कुसूम भामरे, शिक्षक संतोष जाधव, शोभा ठेपणे यांचे प्रयत्न सुरू होते. रोटरी क्लब आॅफ नॉर्थ नाशिकचे अध्यक्ष मनिष गाडेकर यांनी शाळेला तीन वर्गखोल्या बांधून देण्याची तयारी दर्शविल्यानंतर अखेर या खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी मनिष गाडेकर यांचेसह महेश आॅबेरॉय, डॉ. नितीन लाड, राजेंद्र भामरे, राजेंद्र धारणकर, उमेश राठोड, उमराळे बिट शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता अहिरे, केंद्रप्रमुख शरद कोठावदे, दिंडोरी पंचायत समितीचे अभियंता शहापेटी व दाते उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास चारोस्कर, सदस्य महेश बनछोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तीन वर्ग खोल्यांचे बांधकाम रोटरीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मनिष गाडेकर यांनी जाहिर केले. ग्रामपंचायत सदस्य निता चौघूले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माला राजेंद्र चारोस्कर, अंजना चारोसकर, सरपंच पुष्पा चारोस्कर, ग्रामसेविका वेताळ आदी उपस्थित होते.

Web Title: Gwaliwada School will get three classrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.