गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:11 AM2018-03-23T00:11:51+5:302018-03-23T00:11:51+5:30

गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे.

Gwalwanch: 'India Bulls' tax exhausted by taxpayers for grinding papers by the Gram Panchayat administration | गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर

गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर

googlenewsNext
ठळक मुद्देझेरॉक्स मशीन ताब्यात घेऊन जप्तीच्या कारवाईस प्रारंभमालमत्ता कर भरला नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे

गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे. कर मागणी करण्यासह नोटिसा बजावूनही कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने जप्तीचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी इंडिया बुल्सच्या कार्यालयात जाऊन एक झेरॉक्स मशीन ताब्यात घेऊन जप्तीच्या कारवाईस प्रारंभ केला. या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. २००७ साली सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात विशेष आर्थिक क्षेत्राचे (सेझ) पदार्पण झाले. एमआयडीसीने इंडिया बुल्सला गुळवंच शिवारातील ३०५ हेक्टर क्षेत्र ९५ वर्षांच्या भाडेकरारावर दिले. या मालमत्तेवर गुळवंच ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारणी केली. मात्र २००७ पासून इंडिया बुल्सने अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर थकबाकी भरण्यासाठी गुळवंच ग्रामपंचायतीने इंडिया बुल्सला तीन नोटिसाही बजावल्या होत्या. यावर्षीही मालमत्ता कर मागणी करण्यात आली होती. मात्र इंडिया बुल्सकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी २० फेबु्रवारीच्या मासिक बैठकीत जप्तीचा निर्णय घेतला. १७ मार्च रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने इंडिया बुल्सकडे महाराष्टÑ ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ (३) प्रमाणे जप्ती करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्त घेऊन सरपंच कविता सानप, उपसरपंच भाऊदास शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे, सदस्य केशव कांगणे, संतोष कांगणे, भगवान सानप, परशराम कांगणे इंडिया बुल्सच्या कार्यालयात गेले. याठिकाणी पंचनामा करीत कंपनीतील कॅनॉन कंपनीचे नादुरुस्त झेरॉक्स मशीन जप्त केले. मालमत्ता कर भरण्यासाठी इंडिया बुल्स कंपनीकडे कर मागणीसह वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळला नाही. यासंदर्भात महाराष्टÑ शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. सेझमध्ये मालमत्ता करात कोणतीही सूट नसल्याचे पत्र ग्रामविकास मंत्रालयाकडून आले. मार्च एण्ड असल्याने मालमत्ता कर थकबाकीपोटी जप्तीची कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली.
- अनिल कानवडे, ग्रामविकास अधिकारी, गुळवंच

Web Title: Gwalwanch: 'India Bulls' tax exhausted by taxpayers for grinding papers by the Gram Panchayat administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.