हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:39 PM2018-08-12T18:39:16+5:302018-08-12T18:39:33+5:30

कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतगड किल्ला बंद असल्याने पर्यटकामधून नाराजी व्यक्त होत असून संमिश्र प्रतिक्रि या उमटत आहेत. हतगड किल्ल्यावर आता शुकशुकाट दिसत आहे.

Haatgad Fort closed to tourists due to security reasons | हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना बंद

हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना बंद

Next

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतगड किल्ला बंद असल्याने पर्यटकामधून नाराजी व्यक्त होत असून संमिश्र प्रतिक्रि या उमटत आहेत. हतगड किल्ल्यावर आता शुकशुकाट दिसत आहे.
नाशिक-सापुतारा रस्त्यावर सापुतारयापासून फक्त पाच किमी अंतरावर असलेला हतगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी हतगड गाव असून किल्ला अतिशय विलोभनीय आहे. किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तू उभ्या आहेत.किल्ल्यावरील वातावरण अत्यंत आल्हाददायक असून पावसाळ्यात तर हिरवेगार गालीचे अंथरलेले वाटतात. किल्ल्यावर सेल्फी नादात दुर्घटना झाली होती.
गुजरात राज्यात पावसाळ्यात शैक्षणकि सहलीचे आयोजन केले जाते. सापुतारा येथील विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेतल्यावर पर्यटक हतगड किल्ला बघण्यासाठी येतात. परंतु किल्ला बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन परत निघून जातात.कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून हतगड किल्ल्याचे संवर्धन व किल्ल्याचा परिसर विकसीत करण्यासाठी लाखोचा खर्च करण्यात आलेला आहे.वनविभागाकडून पर्यटनस्थळी प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. या रक्कमेतून पर्यटनस्थळांची देखरेख करण्यात येते. मात्र आता नेमकी पर्यटकाच्या माध्यमातून पैसे मिळवण्याच्या वेळ आली असताना वनविभागाने किल्ल्यावर प्रवेश केल्याने देखभाल दुरूस्तीचा खर्च भागवायचा असा प्रश्न वन व्यवस्थापन समतिीला पडला आहे. शिवाय पर्यटकांची एकदा पाठ वळली तर ते पुन्हा किल्ल्याकडे फिरकणार नाही.किल्ल्यावरील प्रवेश बंदी उठवावी अशी मागणी पर्यटकामधून होत आहे.
चौकशी विभाग बंद
वनविभागाने हतगड किल्ल्यावर प्रवेशाजवळ चौकशी विभाग सुरू करण्यात आला आहे. पण हा विभाग कायम बंद असतो. या खोलीला कायम कुलूप लागलेले असते. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येथे पर्यटकांना माहिती देण्यासाठी सुरक्षारक्षक नेताना.

Web Title: Haatgad Fort closed to tourists due to security reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.