सिन्नरच्या पूर्व भागात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:45+5:302021-03-22T04:13:45+5:30

सिन्नर तालुक्यातील पाथरे परिसरात ढगांच्या कडकडासह अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत असताना ...

Hail in the eastern part of Sinnar | सिन्नरच्या पूर्व भागात गारांचा पाऊस

सिन्नरच्या पूर्व भागात गारांचा पाऊस

Next

सिन्नर तालुक्यातील पाथरे परिसरात ढगांच्या कडकडासह अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट उभे ठाकले आहे. पाथरे परिसरात पावसाने गारांसह हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारास दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामळे जागोजागी गारां साचल्या होत्या. या भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतात कांदे, गहू , हरभरा, फळभाज्या, द्राक्षे, डाळिंंब अशी पीक आहेत. वादळ, पावसामुळे या पिकांचं नुकसान झाले आहे. डाळिंबाची फुले गळून पडली आहे. काही ठिकाणी वादळामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. अजूनही ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. अजूनही हा अवकाळी पाऊस किती दिवस राहील याची शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

Web Title: Hail in the eastern part of Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.