एचएएल कारखान्याचे कामकाज सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 01:38 AM2021-05-01T01:38:32+5:302021-05-01T01:39:22+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या एचएएल कारखान्याचे कामकाज गुरुवार (दि.२९) पासून तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये  सुरू करण्यात आले आहे.

HAL factory resumes operations | एचएएल कारखान्याचे कामकाज सुरू

एचएएल कारखान्याचे कामकाज सुरू

googlenewsNext

ओझर टाऊनशिप : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या एचएएल कारखान्याचे कामकाज गुरुवार (दि.२९) पासून तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये  सुरू करण्यात आले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या हेतूने कामगार संख्या तीन शिफ्टमध्ये विभागण्यात आली आहे. कारखान्यात वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी कामगारांसाठी प्रवेशद्वारावरच रॅपिड अँटिजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे   कोविडबाधित होऊन गेले आहेत  किंवा ज्यांनी लसीकरण केले असेल त्यांना प्रमाणपत्र जवळ बाळगण्यास सांगण्यात आले आहे.   प्रमाणपत्र मोबाईलमध्ये असल्यास ते दाखविण्यासाठी त्या दिवसापुरता अँड्रॉइड मोबाइल सोबत ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

Web Title: HAL factory resumes operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.