एचएएल कारखान्याचे कामकाज पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:06+5:302021-05-01T04:13:06+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या हेतूने कामगार संख्या तीन शिफ्टमध्ये विभागण्यात आली आहे. कारखान्यात वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी कामगारांसाठी प्रवेशद्वारावरच ...
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या हेतूने कामगार संख्या तीन शिफ्टमध्ये विभागण्यात आली आहे.
कारखान्यात वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी कामगारांसाठी प्रवेशद्वारावरच रॅपिड अँटिजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे कोविडबाधित होऊन गेले आहेत किंवा ज्यांनी लसीकरण केले असेल त्यांना प्रमाणपत्र जवळ बाळगण्यास सांगण्यात आले आहे. प्रमाणपत्र मोबाईलमध्ये असल्यास ते दाखविण्यासाठी त्या दिवसापुरता अँड्रॉइड मोबाइल सोबत ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, तसेच
दुसरी शिफ्ट व तिसऱ्या शिफ्ट (नाईट शिफ्ट) मधील कामगारांसाठी हॉस्पिटल मध्ये दिवसभर रॅपिड अँटिजन टेस्ट सुरू राहणार आहेत. शिकाऊ कामगार (अप्रेंटिस) आणि कंत्राटी कामगार यांना (अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगार वगळता) पुढील कारखाना आदेशापर्यंत कामावर बोलविण्यात आलेले नाही. याचबरोबर शासकीय आदेशान्वये ४५ वर्षांखालील सर्वांना लसीकरण करण्याची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून लवकरात लवकर सर्व कामगार बांधवांना लस मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे.