एचएएल कर्मचारी आजपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:50 AM2019-10-14T01:50:46+5:302019-10-14T01:51:12+5:30

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली चर्चा फिस्कटल्याने नाशिकसह देशभरातील ९ प्रभागांतील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासून (दि.१४) बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे.

HAL staff on strike today | एचएएल कर्मचारी आजपासून संपावर

एचएएल कर्मचारी आजपासून संपावर

googlenewsNext

ओझर टाउनशिप : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली चर्चा फिस्कटल्याने नाशिकसह देशभरातील ९ प्रभागांतील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासून (दि.१४) बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे.
३४ महिन्यांपासून अधिकारी वर्ग वाढीव पगाराचा लाभ घेत असून, फक्त कामगारांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएलचे उच्च व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एचएएल व्यवस्थापनाने कामगारांची निराशा केली असून, अधिकारी वर्गाला भरघोस वेतनवाढ दिली. मात्र, कामगारांना तुटपुंजी वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिल्याचे समजताच संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आस्थापनेप्रति कामगार प्रामाणिक असून, कंपनी जर आर्थिक संकटात असेल तर अधिकारीवर्गाला दिलेली वेतनवाढ रद्द करावी आणि आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगारांची वेतनवाढ करावी, अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे. संघटनेने आजपासून आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: HAL staff on strike today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.