एचएएल कामगार आज संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:58 AM2018-08-24T00:58:21+5:302018-08-24T00:59:22+5:30
ओझर : आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन को-आॅर्डिनेशन कमिटीच्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि.२४) भारतातील सर्व ठिकाणचे एचएएल कामगार एकदिवसीय संपावर जात आहे; मात्र कंपनीच्या अत्यावश्यक सेवांना या संपातून वगळण्यात आले आहे.
ओझर : आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन को-आॅर्डिनेशन कमिटीच्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि.२४) भारतातील सर्व ठिकाणचे एचएएल कामगार एकदिवसीय संपावर जात आहे; मात्र कंपनीच्या अत्यावश्यक सेवांना या संपातून वगळण्यात आले आहे. येथील एचएएल कामगार संघटनेतर्फे दिनांक १७ आॅगस्ट रोजी मुख्य प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. पाच वर्षांचा वेतन करार झालाच पाहिजे, यासह कामगारांनी विविध घोषणा दिल्या. एचएएलचा वेतन करार संपला असून, नवीन वेतन कराराची बोलणी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सुरू आहेत; परंतु बंगलोर
येथे झालेल्या उच्च व्यवस्थापनाबरोबर चर्चेत व्यवस्थापन १० वर्ष तर कामगार संघटना ५ वर्ष कालावधीच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
वेतनकराराच्या मागणीसाठी कामगार संघटनेने आंदोलनाचा मार्ग अवलंबिला असल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.