जिल्ह्यातील उपचारार्थी दीडशेपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 01:02 AM2022-06-20T01:02:50+5:302022-06-20T01:03:07+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि.१९) तब्बल ३९ रुग्ण नवीन कोरोनाबाधित, तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या दीडशेपार जाऊन १५८ पर्यंत पोहोचली आहे.

Half a dozen patients in the district! | जिल्ह्यातील उपचारार्थी दीडशेपार !

जिल्ह्यातील उपचारार्थी दीडशेपार !

Next
ठळक मुद्देदिवसभरात ३९ बाधित; २० कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.१९) तब्बल ३९ रुग्ण नवीन कोरोनाबाधित, तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या दीडशेपार जाऊन १५८ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे नवीन रुग्ण सलग दुसऱ्या दिवशी पस्तिशीपार आहेत. त्यामुळे उपचारार्थींमध्ये वाढ झाली असून त्यात सर्वाधिक १०३ रुग्ण नाशिक मनपा, ४८ रुग्ण नाशिक ग्रामीण, मालेगाव मनपा १ आणि जिल्हा बाह्य ६ उपचारार्थींचा समावेश आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.४३ टक्के असून कोरोनामुक्तच्या दरात थोडीशी घसरण होऊन तो ९८.१० टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांच्या संख्येत घट येऊन ती संख्या ५५ पर्यंत आली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावर पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे.

Web Title: Half a dozen patients in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.