विद्युत तारा पडल्याने दीड एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:42 AM2017-10-27T00:42:24+5:302017-10-27T00:42:32+5:30

जीर्ण झालेल्या विद्युत तारा एकमेकांना घासून विजेच्या पडणाºया ठिणगीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील तळवाडे येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडला. या घटनेत दीड एकर ऊस खाक झाला आहे.

Half acre of sugarcane due to lightning fall | विद्युत तारा पडल्याने दीड एकर ऊस खाक

विद्युत तारा पडल्याने दीड एकर ऊस खाक

Next

सायखेडा : जीर्ण झालेल्या विद्युत तारा एकमेकांना घासून विजेच्या पडणाºया ठिणगीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील तळवाडे येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडला. या घटनेत दीड एकर ऊस खाक झाला आहे.
उसाच्या शेतावरून विद्युत तारा गेल्या असून, या तारा जुन्या झाल्याने त्यांची क्षमता संपल्याने तारा तुटल्याच्या घटना वारंवार घडतात. येथील पोपट सावळीराव सांगळे यांचे गट क्रमांक १०६ तर त्यांच्याच शेजारी असलेल्या सुखदेव फिकरा सांगळे यांच्या शेतातील गट १०७ मधील उसावर तारा पडल्याने दीड एकर क्षेत्र होरपळले आहे. सांगळे यांची तळवाडे गावालगत ऊस असुन ऊस क्षेत्रात वरून जाणाºया विद्युत तारा लोंबकळत असल्याने शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गोदाकाठ भागातील या महिन्यातील ही चौथी घटना आहे. वारंवार होणाºया शॉर्टसर्किटमुळे शेतकरी त्रस्त झाला असून, भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Half acre of sugarcane due to lightning fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.