चाटोरीत शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 06:59 PM2018-11-03T18:59:14+5:302018-11-03T19:00:14+5:30
सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.
सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.
गोदावरी नदीकाठी चंद्रकांत रु ंजाजी घोलप (गट नं. ७०८), तसेच शरद छबू हांडगे, रावसाहेब वाळू हांडगे, दीपक संतू हांडगे
यांचे (गट नं. ७०९) शेती क्षेत्र असून, सकाळी ११ वाजेच्या सुमारास या ठिकाणी उसाने पेट घेतला. धुराचे लोळच्या लोळ उठत असल्याचे बघून, आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत सुमारे दीड एकर ऊस जळून खाक झाला होता. ग्रामस्थांनी प्रसंगावधानता दाखविल्याने आसपासचे सुमारे १००-१५० एकर ऊस क्षेत्र वाचविण्यात यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी येथून
जवळच असलेल्या, ऊस क्षेत्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झाला होता.
शॉर्टसर्किटमुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकºयांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, अन् मिळाली तर तीदेखील तुटपुंजी मिळते, त्यात भांडवलही वसूल होत नसल्याने रहिवासी, शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वीज वितरणने भरीव आर्थिक मदत द्यावी.
- नारायण घोलप, शेतकरी, चाटोरी.