कोरोनामुक्तच्या तुलनेत दीडपट बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 01:32 AM2021-08-12T01:32:03+5:302021-08-12T01:32:53+5:30
जिल्ह्यात बुधवारी (दि.११) एकूण ६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी त्याच्या दीडपट म्हणजेच १०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५४१ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.११) एकूण ६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी त्याच्या दीडपट म्हणजेच १०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८५४१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात बाधित आढळून आलेल्या १०५ नागरिकांपैकी ४३ मनपा हद्दीतील नाशिक ग्रामीणचे ४९, जिल्हाबाह्य ११ तर मालेगाव मनपाच्या २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या १०८६ असून कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६१ वर पोहोचले आहे, तर प्रलंबित अहवालांची संख्या ९६९ आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४,०३,६३६ तर कोरोनामुक्त झालेल्या ३,९४,००९ वर पोहोचली आहे.