बिनविरोध निवडणुकीचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:47 AM2019-11-22T00:47:16+5:302019-11-22T00:48:16+5:30

नांदगाव : सत्तेच्या सारिपाटात मोठी पदे मिळविण्यासाठी तत्त्वांचा बाजार मांडणाऱ्या गावगुंडीच्या राजकारणात अन् कुरघोडीचा डाव खेळण्याच्या भाऊगर्दीत नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक गावाचा गेल्या दहा पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकांचा कित्ता सर्वांनी गिरवावा असाच आहे. गेल्या ५० वर्षांत बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीचा आदर्श निर्माण करणाºया बाणगाव बुदु्रकची निवडणूक याहीवेळी बिनविरोध झाली. नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार रिंगणात उरले. सर्व गावाला एका सूत्रात ओवण्याचे श्रेय बापूसाहेब कवडे या एका व्यक्तीकडे जाते.

Half a century of unopposed elections | बिनविरोध निवडणुकीचे अर्धशतक

‘बाणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विजयाची निशाणी दाखविताना बापूसाहेब कवडे व संगीताबाई बागुल. समवेत शांताराम कवडे, नारायण कवडे, पल्लवी घोडके, रावसाहेब बागुल, अलका कवडे, संगीता देवकर, सुनील कवडे, जनाबाई कवडे व त्यांचे समर्थक.

googlenewsNext
ठळक मुद्देबाणगाव ग्रामपंचायतीचा आदर्श : कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : सत्तेच्या सारिपाटात मोठी पदे मिळविण्यासाठी तत्त्वांचा बाजार मांडणाऱ्या गावगुंडीच्या राजकारणात अन् कुरघोडीचा डाव खेळण्याच्या भाऊगर्दीत नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक गावाचा गेल्या दहा पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकांचा कित्ता सर्वांनी गिरवावा असाच आहे.
गेल्या ५० वर्षांत बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीचा आदर्श निर्माण करणाºया बाणगाव बुदु्रकची निवडणूक याहीवेळी बिनविरोध झाली. नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार रिंगणात उरले. सर्व गावाला एका सूत्रात ओवण्याचे श्रेय बापूसाहेब कवडे या एका व्यक्तीकडे जाते.
यावेळी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी संगीताबाई गोविंद बागुल या महिलेची जनतेमधून बिनविरोध निवड झाली. तर तीन प्रभागातील नऊ जागांवर अनुक्र मे शांताराम कवडे, नारायण कवडे, पल्लवी घोडके, रावसाहेब बागुल, अलका कवडे, संगीता देवकर, सुनील कवडे, जनाबाई कवडे हे उमेदवार रिंगणात आहेत. १९६६ मध्ये बाणगाव बुद्रुक व खुर्द या ग्रुप ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक बिनविरोध झाली. मात्र १९७० च्या निवडणुकीत वाद निर्माण होऊन मोठ्या स्वरूपात भांडणे झाली. त्यावेळी गावाची समजूत घालून त्यांना एकत्र करण्यासाठी बापूसाहेब कवडे यांनी मोठी भूमिका बजावली. यापुढे निवडणूक बिनविरोधच करायची, असा गावाने निर्णय घेतला, तो आजतागायत पाळला. विशेष म्हणजे कवडे यांच्या घरातील एकही व्यक्ती आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झालेली नाही.गाव करील ते राव काय करील !गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती बाणगाव बुने खरी ठरविताना बाणगावचा बाणा एकोप्याचाच आहे हे गावाने दाखवून दिले. गावाला सूत्रात ओवणारे कवडे हे शिवसेनेचे आहेत. आजच्या स्थितीवर गावचे भाजपचे नेते सजन कवडे यांची प्रतिक्रि या बोलकी आहे. ते म्हणाले की, ‘एकोपा असल्याने अनेक दिवस आमच्या घरात सत्ता होती. यावेळी आमच्या घरात सत्ता नको. दुसºया कोणाला तरी पद द्या, असे सांगितले.

Web Title: Half a century of unopposed elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.