अर्धे शहर पाच तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:40 AM2018-04-13T00:40:29+5:302018-04-13T00:40:29+5:30

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

Half the city for five hours in the dark | अर्धे शहर पाच तास अंधारात

अर्धे शहर पाच तास अंधारात

Next
ठळक मुद्देतांत्रिक बिघाड : करंट ट्रान्सफार्मरला आग; पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीतशहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
उन्हामुळे नाशिककर हैराण झालेले असतानाच सायंकाळी विजेअभावी रस्त्यावरील पथदीप व घरातील दिवेही बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शहर विभाग-१ अंतर्गत येणाऱ्या टाकळी सबस्टेशन येथे सायंकाळी करंट ट्रान्सफार्मर (सीटी)ला आग लागल्यामुळे अनेक फिडर्सवरील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे सीबीएस, शालिमार, एम.जी.रोड, गंगापूररोड आणि शरणपूररोडचा काही परिसर, गंजमाळ, द्वारका, काठेगल्ली , जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ खंडित होता.सिडको, सातपूरला वीज गायबसायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यामुळे सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटीसह परिसरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. टाकळी येथील केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे निम्मे शहर अंधारात असताना सायंकाळी झालेल्या पावसामुळेदेखील अनेक भागांतील खंडित वीजपुरवठ्याने त्यात भर पडली.दोन्ही विभागातील फिडर्स प्रभावित सिटीला लागलेल्या आगीमुळे शहरातील बहुतांश भागातील फिडर्सला वीजपुरवठा होऊ न शकल्याने या फिडर्सवरील वीजग्राहकांचादेखील वीजपुरवठा खंडित झाला. शहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला.
सायंकाळच्या सुमारास ऐन बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. तर रहिवासी क्षेत्रातही वीज गायब झाल्याने नागरिकांना वीज कंपनीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली. परंतु नेहमीप्रमाणेच ग्राहकांना कुठूनही पुरेशी माहिती मिळत नसल्याने वीज कधी येणार याची वाट ग्राहकांना रात्री १० वाजेपर्यंत पहावी लागली. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.

Web Title: Half the city for five hours in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.