निम्मे शहर सामसूम : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:39 PM2018-08-09T16:39:08+5:302018-08-09T16:44:14+5:30

डोंगरे वसतिगृह मैदानावरही दोन वाहानांच्या काचा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या. आंदोलकांनी मैदानावरून राजकीय नेत्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला.

 Half of the city Samasoom: The Maratha agitator attacked in Nashik | निम्मे शहर सामसूम : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

निम्मे शहर सामसूम : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Next
ठळक मुद्दे नाशकात मराठा समाजाच्या आंदोलकांचा संयम सुटल्याचे चित्रशहरात शुकशुकाट; वर्दळ मंदावली

नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला होता. या निर्णयानुसार आंदोलनाला सकाळी दहा वाजता मैदानावर प्रारंभही झाला. मात्र या दरम्यान, अंतर्गत मतभेद आणि राजकीय नेतेमंडळीच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांमध्ये ठिणगी पडली. ठिय्या आंदोलन करणारे आंदोलक अचानकपणे आक्रमक झाले आणि आंदोलकांचा गट मैदानावरून शहरातील बाजारपेठेच्या दिशेने सरकला. यावेळी आंदोलकांनी मेहेर सिग्नल चौकात हुल्लडबाजी करत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडत ‘खाकी’स्टाईलने जमाव पांगविला. याचदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावरही दोन वाहानांच्या काचा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या.

आंदोलकांनी मैदानावरून राजकीय नेत्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला. दरम्यान, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना यावेळी धक्काबुक्की करण्यात आल्याचे समजते तसेच राजकीय नेत्यांच्या दिशेने काही पादत्राणे भिरकाविण्यात आली. डोंगरे वसतिगृहयेथून मराठा आंदोलकांचा मोर्चा अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, रेडक्रॉस चौक, शालिमार, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, चांडक सर्कल येथून टिळकवाडी, शरणपूररोडमार्गे डोंगरे वसतिगृहाकडे आला. येथे पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी न जुमानता द्वारका चौकात रास्ता रोको करण्याचा हट्ट धरला आणि दुचाकींवरून द्वारकेच्या दिशेने प्रस्थान केले. एकूणच नाशकात मराठा समाजाच्या आंदोलकांचा संयम सुटल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले.

शहरात शुकशुकाट; वर्दळ मंदावली
मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलक आक्रमक झाल्यामुळे शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, शालिमार, रविवारकारंजा, मेनरोड, शिवाजीरोड, भद्रकाली, जुने नाशिक या संपुर्ण भागात शुकशुकाट पसरला आहे. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असून दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी गस्तीवर आहे.

Web Title:  Half of the city Samasoom: The Maratha agitator attacked in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.