अर्धातास मृतदेह रस्त्यात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:29 AM2018-07-09T00:29:48+5:302018-07-09T00:31:53+5:30
नाशिकरोड : देवळाली कॅम्पहून नाशिकरोडकडे येत असताना विहितगाव वडनेररोड चौफुलीवर पिकअप व्हॅनने दुचाकीला दिलेल्या धडकेत मयत झालेल्या युवकाचा मृतदेह पोलिसांच्या हद्दीच्या वादावरून रस्त्यातच पडून होता. पोलिसांच्या या असंवेदनशील वर्तणुकीमुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
नाशिकरोड : देवळाली कॅम्पहून नाशिकरोडकडे येत असताना विहितगाव वडनेररोड चौफुलीवर पिकअप व्हॅनने दुचाकीला दिलेल्या धडकेत मयत झालेल्या युवकाचा मृतदेह पोलिसांच्या हद्दीच्या वादावरून रस्त्यातच पडून होता. पोलिसांच्या या असंवेदनशील वर्तणुकीमुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
विहितगावच्या वडनेररोड चौफुलीच्या वळणावर रविवारी दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याला कळवले. तथापि, ही आपली हद्द नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नाशिकरोड ठाण्याला कळवल्यावर त्यांच्याकडूनही असेच उत्तर मिळाले. त्यामुळे युवकाचा मृतदेह अर्धातास पडून होता.
अनिल संजय बाजाड (२५, रा. औटेनगर, जयभवानीरोड, नाशिकरोड) हा आकाश गजानन वानखेडे (१६), रोहित भांगरे (२४) या दोघांना आपल्या पल्सर गाडीवर (एमएच १५, बीवाय ४२) घेऊन देवळाली कॅम्पहून नाशिकरोडकडे येत होते. विहितगाव येथील वडनेररोड चौफुलीवर पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल बाजाड हा जागीच ठार झाला, तर आकाश आणि रोहित हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर पिकअपचालक फरार झाला. दोघा जखमींना तातडीने बिटको रु ग्णालयात दाखल केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
१०८ क्रमांकाचे वाहन धावले मदतीला
दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याला कळवले. तथापि, ही आपली हद्द नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नाशिकरोड ठाण्याला कळवल्यावर त्यांनीही तीच भूमिका घेतली. अखेर नागरिकांनी १०८ क्र मांकाला फोन केला. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या १०८ वाहनातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला, तर जखमींना बिटकोत दाखल करण्यात आले.