दीड लाखाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:47 PM2019-03-28T23:47:34+5:302019-03-28T23:47:57+5:30
नाशिक : एका भामट्याने महिलेच्या एटीएम कार्डाचा गैरवापर करीत दिशाभूल करून परस्पर बँकेच्या बचत खात्यामधून सुमारे १ लाख ४८ हजार ३६७ रुपयांची रोकड काढून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देअज्ञात भामट्याने त्यांच्या एटीएम कार्डचा गैरवापर
नाशिक : एका भामट्याने महिलेच्या एटीएम कार्डाचा गैरवापर करीत दिशाभूल करून परस्पर बँकेच्या बचत खात्यामधून सुमारे १ लाख ४८ हजार ३६७ रुपयांची रोकड काढून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता नीलेश भोळे (३५ रा. जेलरोड) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भोळे यांचे आयडीबीआय बँकेत बचत खाते आहे. १० डिसेंबर २०१८ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत अज्ञात भामट्याने त्यांच्या एटीएम कार्डचा गैरवापर करीत १ लाख ४८ हजार ३६७ रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली.