शहरात दीड लाख बालकांना डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:29 AM2018-01-29T00:29:44+5:302018-01-29T00:30:14+5:30
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख ४१ हजार १९१ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ४५ हजार १८४ असे एकूण ५ लाख ८६ हजार ३७५ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़
नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख ४१ हजार १९१ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ४५ हजार १८४ असे एकूण ५ लाख ८६ हजार ३७५ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक केंद्रात लहान बालकाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़ जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला़ शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात ६९३ बुथसह फिरते पथक अशी यंत्रणा उभारण्यात आली. ० ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित १ लाख ८६ हजार ८३८ बालकांपैकी १ लाख ४१ हजार १९१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़
पोलिओ डोसची शहरातील बालकांची संख्या
शहरी आरोग्य सेवा केंद्र सातपूर-४,०५३, संजीवनगर-५,१५२,
आरसीएच केंद्र गंगापूर-७,७२२, एमएचबी कॉलनी-५,१७७,
सिडको - ४,७१९, अंबड-४,८२५, मोरवाडी-४,६६१, कामटवाडे-४,६३८,
पवननगर-४,९१५, पिंपळगाव खांब-४,५७९, नाशिकरोड-५,३७३,
विहितगाव-३,६६७, सिन्नर फाटा-४,७३७, गोरेवाडी-३,१०७,
दसकपंचक-४,५५५, उपनगर-४,७४९, संगमा-४,६४६,बजरंगवाडी -४,५५४,
भारतनगर-४,६८७, वडाळागाव-४,३६५, जिजामाता-३,९६७,
मुलतानपुरा-४,६४७, शासकीय रुग्णालय-६,५६९, रामवाडी- ३,१०८,
रेडक्रॉस-३,६०४, मायको पंचवटी-४,७५६, म्हसरूळ- ५,६०८,
मखमलाबाद-५,४६९, तपोवन-४,२०७, हिरावाडी-४,३७५
एकूण १ लाख ४१ हजार १९१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी ३,६८३ बुथ लावण्यात आले होते़ यासाठी ९,३६३ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ ग्रामीण व शहरी भागात ही मोहीम आणखी चार दिवस म्हणजेच २ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत़ या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विभागीय अधिकारी, खासगी सहा़ परिचारिका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, अंगणवाडीसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले़
जिल्ह्यातील तालुकानिहाय पोलिओ डोसची संख्या
नाशिक-२३,४०७, बागलाण-३७,८९६, चांदवड-२७,१०७, देवळा -१५,३९७, दिंडोरी-३४,९७५, इगतपुरी-२५,३५६, कळवण-२१,३३७, मालेगाव-४०,२९९, नांदगाव-१९,९८९, निफाड-५३,६५२, पेठ-१२,९४६, सिन्नर-२७,६८६, सुरगाणा- १८,४७७, त्र्यंबकेश्वर-१७,४१४, येवला-२१,४३६ असे एकूण ४ लाख ४५ हजार १८४ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़