निम्म्या लोकांना माघारी फिरावे लागते उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:23+5:302021-07-28T04:14:23+5:30
------- जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे- ६० रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या- ८६०० शहरातील एकूण शिवभोजन केंद्रे- २२ शहरातील लाभार्थ्यांची ...
-------
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे- ६०
रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या- ८६००
शहरातील एकूण शिवभोजन केंद्रे- २२
शहरातील लाभार्थ्यांची संख्या- ५०००
----------
टिळकपथ केंद्र : शहरातील मध्यवर्ती केंद्र असल्याने या ठिकाणी तीनशे थाळींचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. लगतच्या बाजूला रुग्णालये असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगली सोय झाली असून, याशिवाय हातमजूर, फेरीवाल्यांना केंद्र चालकाकडून मोफत थाळीचे वाटप केले जात आहे.
----------
जुना आग्रारोड केंद्र : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केंद्र सुरू करण्यात आले आहे. कार्यालयात शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची शिवभोजन केंद्राने मोठी सोय होत आहे. शिवाय मध्यवर्ती बसस्थानक जवळ असल्याने त्यांनाही लाभ होत आहे.
-------------
रोज साडेआठ हजारांचे फोट भरते; बाकींच्यांचे काय ?
* शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद पाहता, या योजनेचा लक्ष्यांक वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
* नाशिक जिल्ह्यात सध्या ६० केंद्रे असून, त्याच्या दीडपट म्हणजेच ३० केंद्रे आता वाढवून मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९० केंद्रे होतील.