स्मार्ट सिटीच्या निम्या सायकली गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 08:26 PM2020-07-25T20:26:27+5:302020-07-26T00:05:20+5:30

नाशिक : शहरात सायकल चळवळ रुजावी यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प गुंडाळला गेल्यानंतर स्मार्ट सिटीने बेवारस पडलेल्या सायकली गोळ्या केल्या असून, यात अवघ्या ५४१ सायकलीच सापडल्या आहेत. उर्वरित सायकली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Half of Smart City's bicycles disappear! | स्मार्ट सिटीच्या निम्या सायकली गायब !

स्मार्ट सिटीच्या निम्या सायकली गायब !

Next
ठळक मुद्देअजब । गोळा करताना उघड झाला प्रकार शहरातील प्रतिसाद घटल्याने कंपनी तोट्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात सायकल चळवळ रुजावी यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प गुंडाळला गेल्यानंतर स्मार्ट सिटीने बेवारस पडलेल्या सायकली गोळ्या केल्या असून, यात अवघ्या ५४१ सायकलीच सापडल्या आहेत. उर्वरित सायकली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि हिरो यूआॅन प्रा. लिमिटेड यांनी संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविला होता. त्यासाठी २७ फेबु्रवारीस करारनामा करण्यात आला होता. कंपनीने यासंदर्भात करारदेखील केला होता. या प्रकल्पास सुरुवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कंपनीने डॉक म्हणजेच सायकलचे स्टेशनची संख्या हळूहळू वाढवत नेली. शहरात विविध भागात डॉकची संख्या वाढत गेल्याने तब्बल शंभर डॉक आणि एक हजार सायकली पुरवण्यात आल्या. त्यानंतर संबंधित कंपनीने २५ इलेक्ट्रिक सायकलीदेखील मागविल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु नंतर गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर सायकलींना मिळणारा प्रतिसाद घटला. त्यातच अनके सायकलीचे स्टॅँड हे चुकीच्या असल्याने चोऱ्या वाढू लागल्या. काही भुरट्या चोरट्यांनी सायकलींचे सीट आणि चाकेदेखील चोरण्यास सुरुवात केली. शहरातील प्रतिसाद घटल्याने कंपनी तोट्यात जाऊ लागली. त्यामुळे त्यांनी अंग काढून घेण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर काम करण्याची इच्छा नसल्याचे कळविले त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने कंपनीला नोटिसा दिल्या आणि अखेरीस १३ लाख रुपयांची सुरक्षा अनामत जमा केली. त्यानंतरदेखील कंपनीने स्वारस्य दाखवले नाही. लॉकडाऊन काळात तर सायकली इतस्तत: बेवारस पडून होत्या. त्यामुळे लोकमतने सचित्र वृत्त दिल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने या सायकली गोळा करण्यास सुरुवात केली. सायकल सेवा देणाºया ठेकेदाराने काम करण्याची इच्छा नसल्याचे दर्शविल्यानंतरदेखील त्याचा पाठपुरावा स्मार्ट सिटीने केला तसेच बेवारस पडलेल्या सायकली जमा केल्या. आता ५४१ सायकलीच जमा झाल्या असून, त्या भांडारात जमा करण्यात आल्या आहेत.
- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी

Web Title: Half of Smart City's bicycles disappear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.