पंधरा दिवसांपासून निम्मे गाव अंधारात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 PM2020-01-20T18:00:08+5:302020-01-20T18:00:45+5:30
ठाणगाव : येथे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. खंडीत झालेल्या वीज पुरवठयामुळे निम्मे गाव पंधरा दिवसापासून अंधारात आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे .
सिन्नर-आडवाडी रस्त्यालगत असणारी रोहित्रावरील महत्त्वाचे भाग कायम झाले आहेत. केवळ सिंगल फ्रेजसाठी तयार केलेल्या २५ केव्हीच्या गट्टूवरच या निम्म्या गावाची वीज अवलंबून असून आठ दिवसांपासून तीन गट्ट्यांमधील दोन गट्टू जळाल्याने निम्मे गाव अंधारात आहे. या भागातील ट्रान्सफार्मरच कुठे गायब झाला याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे. ट्रान्सफार्मर नसतांना इतके दिवस वीज पुरवठा कसा सुरळीत होता असा प्रश्न ग्रामस्थात उपस्थित केला जात आहे. दिवसा वीज सुरळीत असते मात्र रात्र झाली की, या निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित होतो. अनियमित वीजपुरवठ्याबाबत रामहरी रेवगडे, नितिन पाटोळे, नवनाथ पाटोळे, शिवाजी पाटोळे, आंनदा गाडेकर, मंहेद्र शिंदे, गणेश लांडगे, विजय केदार, संतोष शिंदे, भगवान शिरसाठ या ग्रामस्थांनी ठाणगाव येथील सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले. निवेदन देऊनही परिस्थितीत काहीही बदल न झाल्याने निम्म्या गावातील ग्रामस्थ सिन्नर येथील वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहेत.