सहामाही परीक्षा दिवाळीनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:59 PM2017-10-04T23:59:00+5:302017-10-04T23:59:11+5:30
नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
राज्य शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षापासून महाराष्टÑ विद्या प्राधिकरणमार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात पायाभूत चाचणी झाल्यानंतर दोन महिन्यात विद्यार्थ्यांची व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ठरवून अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी शिक्षकांनी करवून घ्यावी जेणे करून दसºयानंतर व दिवाळीपूर्वी होणाºया सहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षेत विद्यार्थी निपुण व्हावेत हा हेतू आहे. त्यासाठी गेल्या वर्षी भाषा व गणित या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणने सर्वच शासकीय व खासगी विद्यालयांना पुरविल्या होत्या. यंदा मात्र दोनऐवजी चार विषयांच्या म्हणजेच भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणमार्फतच पुरविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. परंतु यंदा राज्य सरकारच्या व विद्या प्राधिकरणच्या उदासीनतेमुळे राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. ज्या पायाभूत चाचणी परीक्षा जुलै महिन्यात होणे अपेक्षित होते, त्यांच्या प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे त्या थेट दोन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या. सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सर्वच शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. शाळांच्या शिक्षकांनी सप्टेंबर महिन्यातच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून आपला निकाल शाळांना व केंद्र प्रमुखांना कळवून टाकला. मात्र परीक्षाच उशिरा झाल्याने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या मूळ हेतूलाच तडा गेला आहे. सुटीचा आनंद हिरावलासहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षा आता ७ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. महापालिका, खासगी शाळांना येत्या १४ आॅक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार असून, ४ नोव्हेंबर रोजी सुट्या संपतील. ५ रोजी रविवार असल्यामुळे सोमवार, दि. ६ रोजी शाळांना सुरुवात होईल व दुसºयाच दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीच्या सुटीत विद्यार्थी व शिक्षकांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.