सभागृहात गाजला मोकाट श्वानांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:32 AM2017-08-30T00:32:58+5:302017-08-30T00:33:04+5:30
गेल्या काही दिवसांपासून पंचवटी विभागातील सर्वच प्रभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. श्वान पकडण्यासाठी किती वाहने, किती जाळ्या वापरतात, पकडलेले श्वान कुठे सोडतात याची विचारणा करून लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला धारेवर धरले.
पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून पंचवटी विभागातील सर्वच प्रभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. श्वान पकडण्यासाठी किती वाहने, किती जाळ्या वापरतात, पकडलेले श्वान कुठे सोडतात याची विचारणा करून लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला धारेवर धरले. पंचवटी प्रभागाची बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विनाचर्चा २० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभीच नगरसेवक रुची कुंभारकर, कमलेश बोडके, सरिता सोनवणे यांनी मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याची तक्रार केली. श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, शिवाय श्वान रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या मागे लागतात. काही दिवसांपूर्वी श्वानांनी बालकांना चावा घेतला होता. आता नागरिकांच्या घरात श्वान गेल्यावर दखल घेतली जाणार का असा संतप्त सवाल करून संबंधित विभागाची कोंडी केली.
नगरसेवक जगदीश पाटील यांनी काही दिवसांपुर्वी पेस्ट कंट्रोलचे काम करणाºया उत्तम बागुल या कर्मचाºयाला श्वानाने चावा घेतल्याची माहिती दिली. तसेच प्रभागात काही दिवसांपूर्वी विद्युत विभागाने केबल टाकली मात्र त्यानंतर पथदीप बंद रहात असल्याच्या तक्र ारी वाढल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रभागात नियमितपणे साफसफाईची कामे होत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार पूनम सोनवणे, नंदिनी बोडके, पूनम धनगर, भिकूबाई बागुल, विमल पाटील यांनी केली. हिरावाडी तसेच प्रभाग क्र मांक ३ मध्ये जवळपास ८० टक्के पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याची तक्र ार पूनम मोगरे यांनी केली. पंतप्रधान योजनेचे अर्ज विक्री केली जात असल्याने लोकप्रतिनिधींची बदनामी होत असल्याची तक्रार शांता हिरे यांनी केली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींची संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना माने यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, राहुल खांदवे, सी. बी. अहेर, संजय गोसावी, विद्युतचे वनमाळी, डॉक्टर कोकणी आदींनी सहभाग नोंदविला होता.