एचएएलचे साडेतीन हजार कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:14 PM2018-08-24T13:14:01+5:302018-08-24T13:14:15+5:30
ओझर- आॅल इंडिया एच.ए.एल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीकडून दि. २४ रोजी पुकारलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला. विशेष बाब म्हणजे सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनी देखील यात पाठिंबा देत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ओझर- आॅल इंडिया एच.ए.एल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीकडून दि. २४ रोजी पुकारलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला. विशेष बाब म्हणजे सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनी देखील यात पाठिंबा देत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतातील संपूर्ण एच.ए.एल कामगार डिव्हिजन एकदिवसीय संपावर गेला होता. त्यामध्ये कंपनीकडून कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सुविधा मध्ये हॉस्पिटल सुविधा, अग्निशमन दल, एअर ट्राफिक कंट्रोल, सिक्युरिटी सुविधा मात्र सुरू होत्या.दरम्यान सकाळपासून कामगारानी सकाळी साडेपाच वाजता एकत्र येत सर्व प्रवेशद्वार बंद करीत कुणालाही हजेरी लावता येणार नाही याची खबरदारी घेतली.दोन्ही प्रवेशद्वार येथे वेतन करार पाच वर्षांचा झालाच पाहिजे, ‘हमारी मांगे पुरी करो’ हम सब एक है तसेच कामगार प्रबोधन गीते गात गेटवर ठिय्या धरला.विविध घोषणाबाजी करत वेतनकराच्या मुद्द्यावर एच. ए.एल कामगार संघटनेतर्फे दि. १७ आॅगस्ट रोजी मुख्य प्रवेशद्वारावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.संरक्षण क्षेत्रातील अग्रणी असलेल्या हिन्दुस्थान ऐरोनॉटिक्स लिमिटेडचा वेतन करार कालावधी संपला असून नविन वेतन कराराची बोलणी व्यवस्थापन आणिक कामगार संघटना यात चालू आहे.परंतू बंगलोर येथे झालेल्या उच्च व्यवस्थापनाबरोबर एकूण सहा चर्चेत व्यवस्थापन दहा वर्ष तर तर कामगार संघटना पाच वर्ष कालावधीच्या मुद्यावर ठाम आहेत. पाच वर्ष वेतनकराराच्या मागणीसाठी एच.ए.एल कामगार संघटनेने संपाचा मार्ग धरला. आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे असे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी सांगितले . वेतन कराराचा कालावधी पाच वर्ष असावा ही कामगार संघटनेची आग्रही भूमिका असून त्यासाठी आंदोलनाच्या पवित्रा घेत असल्याचे प्रतिपादन संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि एच.ए.एल समन्वय समतिीचे प्रवक्ते भानुदास शेळके,सरचिटणीस सचिन ढोमसे,दीपक कदम जितू जाधव योगेश ठुबे,गिरीश वलवे,भूषण ब्यास,अमोल जोशी, मिलिंद निकम, आनंद गांगुर्डे, स्वप्नील तिजोरे, सुरेश पाटील आदींसह पदाधिकारी व सर्व कामगार संपात सहभागी होते.